Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर
  • heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी
  • Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी
  • कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश
  • अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड
  • पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे
  • Nanded-Latur ; नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती! खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती
  • जागतिक वारसा ठरलेल्या मराठा किल्ल्यांच्या जतनासाठी खा. अशोकराव चव्हाण यांची कृती आराखड्याची मागणी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नांदेड महाराष्ट्र व्हिडीओ August 26, 2025

Vande Bharat Express : नांदेड- मुंबई ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ने उघडले मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नांदेड - मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ नांदेड रेल्वे स्थानकावर उत्साहाचे वातावरण
NNL TeamBy NNL TeamAugust 26, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| मराठवाड्याचे मागासलेपण दूर करण्यासाठी शासन येथील गतिमान दळणवळणावर भर देत आहे. ‘ वंदे भारत एक्सप्रेस’ ने नांदेड राजधानी मुंबईच्या अधिक जवळ आले असून यामुळे निश्चितच मराठवाड्याच्या समृद्धीचे द्वार उघडले आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा नांदेड रेल्वे स्थानकावरून शुभारंभ करण्यात आला. या रेल्वे गाडीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातून ऑनलाइन पद्धतीने हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमाला सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर-साकोरे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, प्रधान मुख्य परिचालन अधिकारी श्याम सुंदर गुप्ता, मुख्य प्रशासकीय अधिकारी (बांधकाम) अवनीश कुमार पांडे, विभागीय प्रबंधक हिरेश मीना आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे कात टाकत आहे. प्रगत देशांसारखे आरामदायक सुविधा असलेली भारतात निर्मित वंदे भारत रेल्वे ही त्याचेच प्रतीक आहे. मुंबई ते नांदेड हे 610 किलोमीटरचे अंतर 9 ते 9.30 तासात पूर्ण होणार आहे. पूर्वी जालनापर्यंत धावणारी वंदे भारत आता हुजूर साहिब नांदेड पर्यंत जात आहे. या रेल्वे गाडीची क्षमता 500 वरून 1440 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच गाडीचे डब्बे 8 वरून 20 पर्यंत वाढवण्यात आले आहे.

नांदेड हे शिख धर्मियांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना, प्रवाशांना वेगवान व आरामदायी प्रवासाची अनुभूती ‘वंदे भारत’ एक्सप्रेसच्या माध्यमातून होणार आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या सुखकर, सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी मराठवाड्यातील जनतेचे अभिनंदनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.

नांदेड येथे आनंद व उत्साहाचे वातावरण
नांदेड येथील रेल्वे स्थानकावर आयोजित कार्यक्रमप्रसंगी खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी राहुल कर्डीले, नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहनिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक सत्यप्रकाश, विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, गुरुद्वारा लंगर साहिबचे संत बाबा बलविंदरसिंघजी, पत्रकार, नागरिक आदीची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित नागरिक व प्रवाशांमध्ये आनंद व उत्साहाचे वातावरण होते.

खासदार अशोक चव्हाण म्हणाले की, नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा आज नांदेड रेल्वे स्थानकावरुन शुभारंभ झाला. ही रेल्वे गाडी म्हणजे विकसित महाराष्ट्राच्या प्रगतीचे पहिले पाऊल आहे. या गाडीचा वेळ अजून कमी केला तर सात तासात ही गाडी मुंबईला पोहोचेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेडचे विमानतळही लवकरच सुरु होईल, यामुळे नांदेडच्या विकासात व दळणवळणात खूप मोठा बदल होईल. तसेच वंदे भारत एक्सप्रेस मुळे जिल्ह्याच्या विकासाला व पर्यटनाला चालना मिळेल. नांदेड- मुंबई प्रमाणेच नांदेड नागपूरला जोडता आले पाहिजे यामुळे व्यापार व उद्योग वाढीस गती मिळेल. नांदेड ते लातूर व नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग झाल्यास नांदेड पुण्याला जोडले जाईल व नांदेड येथील विद्यार्थ्यांची सोय होऊन नांदेडच्या शैक्षणिक प्रगतीला गती मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी नांदेड – मुंबई वंदे भारत एक्सप्रेस सुरू केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विन वैष्णव व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. वंदे भारत एक्सप्रेस ही नांदेडकरांसाठी अमुल्य भेट असून सर्व सोयीसुविधा या गाडीत आहेत. प्रवाशांनी या रेल्वेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. आमदार विक्रम काळे यांनी नांदेड येथून बिदर व लातूर येथे रेल्वे लवकरच सुरु व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करून नांदेड येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्याबद्दल सर्वांना शुभेच्छा दिल्या.

वेगवान, सुरक्षित, आरामदायी व सोयीस्कर प्रवास- मराठवाडा विभागातील रेल्वे प्रवासात मोठा बदल घडवणारी वंदे भारत एक्सप्रेस आता हजूर साहिब नांदेडपर्यंत धावणार आहे. आतापर्यंत ही गाडी जालना ते मुंबई दरम्यान चालत होती, पण आता ती प्रथमच नांदेडहून जाणार आहे. ही गाडी पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेली असून आधुनिक सुविधा आणि आकर्षक रचना यात आहे. या मार्गावरील ही सर्वात वेगवान गाडी असून इतर गाड्यांच्या तुलनेत कमी वेळेत प्रवास पूर्ण करते. गाडीमध्ये 20 डबे असून 1440 प्रवासी बसण्याची सोय आहे.

फायदे
* मराठवाड्यातील नांदेडला राज्याची राजधानी मुंबईशी जोडणारी पहिली वंदे भारत एक्सप्रेस
* नांदेड ते मुंबई असा 610 कि. मी. चा प्रवास फक्त 09 तास 30 मिनिटांत पूर्ण, इतर गाड्यांच्या तुलनेत प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी
* गाडीचे डबे 8 वरून वाढवून 20 करण्यात आले असून, प्रवासी आसन क्षमता 530 वरून 1440 पर्यंत वाढवली आहे, ज्यामुळे अधिक प्रवाशांना सुविधा मिळणार
* महाराष्ट्रातील प्रमुख पर्यटनस्थळे व धार्मिक स्थळांदरम्यान वेगवान, सुरक्षित आणि आरामदायी दिवसभरातील एसी प्रवासाची सुविधा
* हुजूर साहिब नांदेड हून बुधवार व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हून गुरुवार वगळता आठवड्यातून सहा दिवस गाडीची सुविधा प्रवाशांना उत्कृष्ट व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो
* वारंवार प्रवास करणारे प्रवासी, भाविक, कर्मचारी व व्यापारी यांच्यासाठी ही गाडी अत्यंत उपयुक्त
* पर्यटनस्थळे व तीर्थक्षेत्रांना जाणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवास आणखी सोपा होतो.

वेळापत्रक नांदेड – मुंबई सीएसएमटी – नांदेड वंदे भारत एक्सप्रेस
गाडी क्रमांक २०७०५ – हुजूर साहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (बुधवार वगळता)
सकाळी ५.०० प्रस्थान, स. ५.४० वा. परभणी, स. ७.२० वा. जालना, स. ८.१३ वा. छत्रपती संभाजीनगर, स. ०९.५८ वा, मनमाड, स. ११.०० वा. नाशिक रोड, दु. ०१.२० वा. कल्याण, दु. ०१.४० वा. ठाणे, दु. ०२.०८ वा. दादर, दु. ०२.२५ वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे आगमन,

गाडी क्रमांक २०७०६ – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हुजूर साहेब नांदेड (गुरुवार वगळता)
दुपारी १.१० वा. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून प्रस्थान, दु. ०१.१७ वा. दादर, दु. ०१.४० वा. ठाणे, दु ०२.०४ वा. कल्याण, दु. ०४.१८ वा. नाशिक रोड, दु. ०५.१८ वा. मनमाड, सायंकाळी ६.४८ वा. छत्रपती संभाजीनगर, रात्री ०७, ४३ वा. जालना, रात्री ९.३३ वा. परभणी, रात्री १०.५० वा. नांदेड येथे आगमन,

Chief Minister Devendra Fadnavis Nanded-Mumbai 'Vande Bharat Express' has opened the door to the prosperity of Marathwada
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGauri Ganapati festival : गौरी गणपती उत्सवा निमित्त हिमायतनगर बाजारपेठेत खरेदीची लगबग
Next Article Ganesh Mandal : गणेश मंडळांनी प्रसाद वितरणात स्वच्छता आणि नोंदणी संबंधी नियमांचे पालन करावे
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

अ.भा. ग्राहक पंचायतच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी रमेश मस्के, सचिवपदी संतोष कुलकर्णी यांची निवड

पोलीस उपमहानिरीक्षकांच्या पथकाची कारवाई; नांदेड व देगलूरमध्ये मटका अड्ड्यांवर छापे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Himayatnagar : हिमायतनगर तालुक्यात सात वनराई बंधाऱ्यांची उभारणी; शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान

December 11, 2025

Anna Bhau Sathe | अण्णा भाऊ साठे वैश्विक भान असलेले लेखक -डॉ. गिरीश मोरे यांचे प्रतिपादन -NNL

August 1, 2024

भारतीय जनता पार्टीला काॅग्रेसची माणसे मारायची आहेत; माजी केंद्रीय राज्यमंत्री सुर्यकांता पाटील यांचा हल्लाबोल -NNL

June 27, 2024

MahaDBT system : रब्बी पीक प्रात्यक्षिकासाठी शेतकरी गट, उत्पादक कंपन्यानी महाडिबीटी प्रणालीवर अर्ज करण्याचे आवाहन

September 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Students of SGGS won the first prize : एसजीजीएस च्या विद्यार्थ्यांना स्मार्ट इंडिया हॅकाथॉन २०२४ स्पर्धेत देश पातळीवर प्रथम पारितोषिक -NNL

Ashok Chavan Nanded | नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना धक्का; डी. पी. सावंतांनी काँग्रेसकडून मागितली उमेदवारी

Island of Andaman : अंदमानच्या बेटावरून (भाग ८ ) लेखक: धर्मभूषण ॲड.दिलीप ठाकूर -NNL

passing away : कालवश पंढरीनाथ मकाजी राऊत यांचं दुःखद निधन

Chief District and Sessions Judge Surekha Kosamkar : कायदे बदलाचे क्रांतीकारी पाऊल समजण्यासाठी मल्टीमीडिया चित्र प्रदर्शन उपयोगी : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश सुरेखा कोसमकर – NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Ram Maharaj : छत्रपतीं सारख दिसन नाही तर त्यांचे विचार असन म्हत्वाच – हभप राम महाराज पांगरीकर

March 12, 2026

heliplant’ project in Nanded : नांदेडमध्ये ४,२५० कोटींचा ‘हेलीप्लांट’ प्रकल्प; २ हजार रोजगाराच्या संधी

March 12, 2026

Intelligent Traffic Management System : नांदेड–अर्धापूर महामार्गावर ‘इंटेलिजेंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम’ उभारण्याची मागणी

March 12, 2026

कुंटूरकर दिव्यांग कार्यशाळेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेत घवघवीत यश

March 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?