Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा
  • Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते
  • Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड
  • Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न
  • आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!
  • ‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट
  • The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे
  • Justice Neeraj Dhote : महाशिबिर व योजनांच्या महामेळाव्यातून कायद्याची माहिती व शासकीय योजना लोकांपर्यंत पोहोचवा – न्यायमूर्ती निरज धोटे
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न
नांदेड महाराष्ट्र March 1, 2026

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

NNL TeamBy NNL TeamMarch 1, 202698
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नायगांव/नांदेड, गोविंद गोडसेलवार| नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे २८ वे वार्षिक अधिवेशन यंदा नायगाव येथे संपन्न झाले, या अधिवेशनाचे मान्यवरांच्या हस्ते सकाळच्या पहिल्या सत्रात थाटात उद्घाटन झाले.

ग्रंथालय चळवळ वृध्दींगत होवुन नवनविन तंत्रज्ञान आत्मसात करत अनेक विषयावर चर्चा घडवुन आनण्यासाठी ग्रंथालय संघाच्या अधिवेशनाच आयोजन करण्यात येत, यंदा हे अधिवेशन कै अमृतराव पाटिल व इंदिरा सार्वजनिक वाचनालय नायगाव (बा) आणि नायगाव तालुक्यातील सार्वजनिक वाचनालयां कडुन संयुक्त पणे अधिवेशन संपन्न झाले, या अधिवेशनाच शानदार उध्दघाटन महाराष्ट्र राज्य ग्रंथाल्य संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, नांदेड चे खासदार प्रा. रविंद्र चव्हाण, स. ग्रंथालय संचालक छत्रपती संभाजी नगर सुनिल हुस्से, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अनिल सुर्यवंशी, राज्य ग्रंथालय निरीक्षक प्रताप सुर्यवंशी, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव निर्मलकुमार सुर्यवंशी माजी आमदार ग्रंथालय महर्षी स्व. गंगाधरजी पटणे यांच्या धर्मपत्नी श्रीमती नंदाताई पटणे, रामजी मेकले, प्रा. बाबासाहेब शिंदे, जिग्रस उपाध्यक्ष राजेंद्र हंबिरे, कोषाध्यक्ष रामराव कोरे, सहसचिव संजय पाटील, हभप गोविंदराव वडगावकर, मान्यवरांच्या हस्ते ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस. आर. रंगनाथन, खासदार कै. वसंतरावजी चव्हाण, स्व गंगाधरजी पटणे यांच्या प्रतीमा पुजन करून अधिवेशनाला सुरूवात झाली.

ग्रंथालय क्षेत्रात प्रदिर्घ काळ सेवा करून यंदा स्वर्गवाशी झालेले गंगाधरजी पटणे यांच्या नांवे ग्रंथमहर्षी गंगाधरजी पटणे पुरस्कार गत ५० वर्ष वाचन चळवळीत कार्य केलेल्या गोविंदराव वडगावकर यांना प्रदान करण्यात आला.

स्व. गंगाधरजी पटने यांची स. ग्रंथालय संचालक सुनिल हुस्से यांचे कडुन आठवण

अधिवेशनाच्या अनुषंगाने स.ग्रंथालय संचालक सुनिल हुस्से यांनी मनोगत व्यक्त केले दरम्यान हुस्से यांनी स्व पटणे यांची अनुपस्थिती जानवते हे पहिल्यांदा होत आहे, यावेळी ते भावनीक झाल्याच दिसुन आल, ग्रंथालय चळवळीला, वाहुन घेत कुठल्याही ग्रंथालय कार्यक्रमात सक्रीय सहभागी होत, ग्रंथालय चळवळीचे प्रश्न घेवुन शासन दरबारी लढत, नांदेडला असतांना पाच वर्ष त्यांचा सहवास लाभला, त्यांना मुंबई मंत्रालयात ग्रंथालयाचे आमदार म्हणुन अनेकजन संबोधत, ओळखत, त्यांच्या जान्याने चळवळीची हानी झाली आहे.

पुढे बोलतांना हुस्से म्हणाले राज्यात १११५५ ग्रंथालय आहेत, पैकी सोलापुर जिल्हयात ८५७ ग्रंथालय असुन जिल्ह्याचा पहिला क्रमांक आहे, तर नांदेड जिल्ह्यात ७१२ ग्रंथालय अहेत, त्याचा दुसरा क्रमांक लागतो. नांदेडने मला भरपुर जीव लावला, म्हणुन पाय आपसुक इकडे वळतात.

मोबाईलचा अतिरेक अविवेकी वापर केवळ टाईमपास म्हणुन अनेकजण करतात, पुस्तक वाचनात माणुस मग्न होतो, रूग्ण होणार नाही, पुस्तकच मोबाईल पासुन वाचु शकतात, पुस्तक जाळण हा अपराध असला तरी, पुस्तक न वाचन हा त्या पेक्षा मोठा गुन्हा आहे, अस सांगत जस हानिकारक पदार्थावर वैधानिक इशारा लिहीला असतो, तसा इशारा हया पुस्तकाने अमुक तमुक फायदा होतो अस देखिल लिहील जाव असही ते म्हणाले.

राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या पोटतीडकीने मांडल्या

राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष गजानन कोटेवार, उपस्थित खासदार रविंद्र चव्हाण यांचे दिर्घ उपस्थिती बद्दल आभार मानत म्हणाले सर्वसामान्य माणसाची कणव त्यामुळे जनतेनी तुम्हाला निवडुन दिले. म्हणुन तुम्ही येथे वेळ दिला. ग्रंथालयाच्या समस्या घेवुन शासन दरबारी खेटे मारतांना आलेला अनुभव कोटेवार यांनी खासदार चव्हाण यांचे समोर कथन केला.

राज्यात मुख्यमंत्री शिंदे, फडवणिस , व उच्चतंत्रशिक्षण मंत्री, अर्थमंत्री यांची अनेकवेळा भेट घेतली, वर्गबदल, दर्जावाढ, अनुदान वाढ, यास मान्यता दिली परंतु आनखी शासन आदेश निघाला नाही. कर्मचाऱ्यांना वर्ग ३, वर्ग ४ चे वेतन द्या , देत नाहीत, ग्रंथालय क्षेत्रात काम करणार्या कर्मचारी ग्रंथपाल यांना वेळेवर कपडे, अन्न, पाणी, मिळत नाही, मुला बाळांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे, अशी खरी खरी एैकवली.

कमी पैसे मिळत असतील, आनखी धिर सोडला नाही, ज्या कर्मचाऱ्याने आत्महत्या केली , ती २७ वर्षीय महिला विधवा होते, आक्रोष नाही पाहु शकत, कर्मचाऱ्यांची परस्थिती बिकट आहे, त्यामुळे रेंगाळलेले प्रश्न मार्गी लागावे अशी पोटतिडकीने विनवणी केली.

आता शांत बसत नाही, अस म्हणत कोटेवार यांनी आमचे लोक उघड्यावर राहत असतील तर ६० वर्षात न्याय मिळत नाही, तो न्याय मागतो म्हणत तीवृ लढ्याचे संकेत दिले. माजी आमदार गंगाधरजी पटने मोठे बंधु होते म्हणत पोरके झाल्याच सांगितल, या पुढील लढाई चव्हाण यांच्या माध्यमातुन लढणार असही ते म्हणाले.

पटणे चव्हाण ह्यातीत असतांना घेतलेला निर्णय “संकल्पपुर्ती” होतेय

नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण बोलतांना म्हणाले; मी ग्रंथालय चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, कर्मचारी यांच्या व्यथा एैकल्यात त्यांचा तो हक्क आहे, ग्रंथालयाच्या प्रश्नावर पत्र तयार करून तो प्रश्न संसदेत माडु अस आश्वासन दिल, एका पत्रावर सर्व खासदारांच्या सहया घेवुन शासमाला मेल पाठवु अस ते म्हणाले, येणाऱ्या काळात माझी कुठे गरज पडेल अशा ठिकाणी आवाज द्या मी तयार आहे असा विश्वास दिला, स्व. गंगाधरजी पटणे व स्व वसंतराव चव्हाण साहेब दोघेही ह्यात असतांना पुढच्या वर्षी ग्रंथालय अधिवेशन घेण्याच मान्य केल होत परंतु आज दोघेही नाहीत हे दुर्दैव आहे, परंतु संकल्पपुर्ती आपल्या कडुन होत आहे. हि गौरवाची बाब आहे अस ते शेवटी म्हणाले.

यावेळी ग्रंथपाल शिवाजी सुर्यवंशी, ग्रंथपाल गोविंद गोडसेलवार, अमोल देशमुख, तगडपल्ले सर, कदम सर कोहळीकर, दिनेश चिट्टे, कपाटे महाराज, कुबेर राठोड, संतोष देशमुख, विठ्ठल काळे, यांचेसह ग्रंथप्रेमी, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते, ग्रंथमित्र, विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार संयोजन समितीतील स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात खुमाशदार सुत्रसंचालन आनेराय सर यांनी केले तर उत्तमराव पाटिल यांनी आभार मानले.

annual convention concludes with grandeur Nanded District Library Association's
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleआरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!
Next Article Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

आरोग्य सेवा मध्ये उत्कृष्ट कामगिरी केले बदल राज्य स्तरावर नांदेड जिल्हाचा गौरव!

‘Kailasa Live’ concert ; सुप्रसिध्द गायक कैलास खेर यांची ‌‘कैलासा लाईव्ह‌’ कॉन्सर्ट

The thrill of wrestling : तळपत्या उन्हात रंगला कुस्त्यांचा थरार; श्री परमेश्वर यात्रेत जल्लोषाची शिखरे

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kamble family ; कांबळे परिवारातर्फे सहायक आयुक्त सुनिल जोंधळे यांचा सपत्नीक व आई-वडिलांचा सहृदयी सत्कार

September 8, 2025

all out operation in Nanded : नांदेड शहरात पोलीसांकडून ऑल आऊट ऑपरेशनमध्ये केलेली कामगिरी -NNL

August 20, 2024

Death of Daulatrao Padmukh : दैनिक समीक्षाचे संपादक रूपेश पाडमुख यांना पितृशोक -NNL

August 4, 2024

Yoga camp ; लोहा येथे सात दिवसीय योग शिबिर संपन्न; रविवारी झाली सांगता -NNL

December 22, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Male sterilization : कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत पुरुष नसबंदी पंधरवडा २०२५

अबबब… चक्क गुगलवर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 752 आय बदलला; अधिवेशनात चर्चा व्हावी -NNL

Wachan Sankalp Maharashtracha : स्कुल कनेक्ट २.० व “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबवणार -NNL

Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL

Bodharkar ; जिल्हा परिषदेचा शाळेत दर्जेदार शिक्षण, आ.बोढारकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Hunger stricke : अनुदान द्या, अन्यथा जीवन संपवू! — पोटा (बु.) येथे उपोषणकर्त्यांचा आक्रमक इशारा

March 2, 2026

Hunger stricke : दोषींवर कारवाई व लाभ मिळेपर्यंत माघार नाही! पोटा येथील उपोषणकर्ते

March 1, 2026

Police Action : नांदेड व परभणी जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई; जुगार अड्ड्यांवर धाड

March 1, 2026

Library Association : नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचे वार्षिक अधिवेशन थाटात संपन्न

March 1, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?