नांदेड| शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन अनेक समस्या ग्रस्ताने व्यापलेला असून मनप भूखंडावर तात्काळ नंतर करण्याची मागणी पोलीस उपमहानिरीक्षक माननीय शहाजी उमाप साहेब यांच्याकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी मागणी केली.
नांदेड शहरातील विमानतळ पोलिस स्टेशन पौर्णिमा नगर येथील एका बोळीत असून पोलीस स्टेशनला जाण्यासाठी अरुंद रस्ता. पार्किंग सुविधा नाही. अपुरी इमारत. पावसाळ्यात छत गळती. पोलीस कर्मचाऱ्यांसाठी अपुऱ्या सुविधा. अशा अनेक समस्या ग्रस्त असलेला पोलीस स्टेशन. सर्वसामान्य नागरिकांना पोलीस स्टेशनचा रस्ताच माहीत होत नाही.
विमानतळ पोलीस स्टेशन खाजगी मालकाच्या इमारतीमध्ये असल्या कारणामुळे शासनाच्या योजना राबविण्यात अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे बाजूला असलेल्या मनपा भूखंड क्रमांक 96 94 या जागेवर स्थलांतर करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेते प्रकाश मारावार यांनी एका निवेदनाद्वारे पोलीस उप महानिरीक्षक माननीय शहाजी उमाप साहेब यांच्याकडे केली.