उस्माननगर, माणिक भिसे| कंधार तालुक्यातील शिराढोण येथे मागील 40 वर्षापासून कार्यरत असलेल्या पारंपारिक नृसिंह गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी मोबीन मुंजेवार तर उपाध्यक्ष पदी हणमंत पांडागळे यांची निवड ही कंधार तालुका भाजपा मंडळ अध्यक्ष बालाजीराव पांडागळे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन पा. पांडागळे, साईनाथ केते, शिवहार पांडागळे यांनी सर्वानुमते निवड केली. ही निवड पंचक्रोशीत आदर्शवत ठरत असल्याचे दिसून येते.


शिराढोण ता . कंधार येथे इ. स.1986 या वर्षी लोकनेते कै. माधवरावजी पाटील पंडागळे साहेब यांच्या संकल्पनेतून या नरसिंह गणेश मंडळाची स्थापना झाली . आज पर्येत मंडळाने समाज उपयोगी उपक्रम राबवून पंचक्रोशीत नावलौकिक मिळविला आहे. गावातील सर्व धर्मांतील लोकांना ( तरुणांना) समभावातून समाजाला सोबत घेऊन एकतेचे प्रतिक दाखवले आहे .


अनेक ठिकाणी समाजा समाजातील तेढ निर्माण होताना पाहतो. परंतु शिराढोण येथील सुपरिचित लोकनेते कै. माधवरावजी पांडागळे यांच्या पुढाकारातून सर्व समाजाला एकत्र येण्यासाठी आणि बंधुभाव एकात्मता निर्माण होण्यासाठी गावात श्री ची प्रतिष्ठापणा केली. त्या उभारलेल्या मंडळाचे अध्यक्ष पदाची वर्णी अनेक वेळा मुस्लिम समाजाला मिळाल्याचे पहावयास मिळाले.



दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मंडळाची कार्यकारणी दिनांक 22 ऑगस्ट रोजी करण्यात आली अध्यक्षपदी मोबीन मुंजेवार यांची निवड करण्यात आली. निवडीची वार्ता सोशल मीडियावर व्हायरल होताच मुस्लिम समाजात आनंदाचे वातावरण पाहावयास मिळाले. शिराढोण सर्कल व परिसरात मुस्लिम समाज बऱ्यापैकी आहे. त्यामुळे कै. माधवरावजी पांडागळे यांच्या नंतर माजी. सभापती बालाजीराव पंडागळे व कुटुंबियांचे प्रेम कायम रुजून आहे अशी भावना मुस्लिम समाजातील बांधवांनी व्यक्त केली.

त्यांचबरोबर 40वर्षपासून चालू असलेल्या नृसिंह गणेश मंडळाने डीजे मुक्त, वृक्षारोपण, शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबीर, अन्नदान,विविध स्पर्धा असे अनेक उपक्रम राबवत 62 गावांतर्गत मिळणारा पोलीस स्टेशन उस्माननगर चा पुरस्कार प्राप्त केला आहे.


