नवीन नांदेड l नावामनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्ग सहाय्यक आयुक्त डॉ. मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी,कर निरीक्षक, वसुली लिपीक यांनी 31,मार्च अखेर मनपा दिलेल्या उदिष्ट पुर्तिकडे वाटचाल केली असून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी 20 टक्के वसुली ज्यादा केली आहे.


नावामनपा मनपा आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक आयुक्त डॉ.मिर्झा बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय कर निरीक्षक वसुली लिपीक यांनी केली आहे.


नावामनपाच्ये आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे यांच्या मार्गदर्शना खाली अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,उपायुक्त अजितपाल सिंग संधू,कर सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉ मिर्झा बेग, कार्यालय अधीक्षक विलास गजभारे,करनिरीक्षक वसंत कल्याणकर, संजय नागापूरकर, मारोती सारंग,वरीष्ठ लिपीक नारायण आठवले,शेख सादुला,वसुली लिपीक ,मालु एनफळे रविंद्र पवळे,सुधीर कांबळे,नरसिंग कुलकर्णी,रमेश यशवंतकर,नथुराम चवरे,विवेक लोखंडे,ऊतम जौधंळे, प्रकाश दर्शने, राहुल पाईकराव,दिपक जौधंळे,यांनी परिसरातील जवळपास 30 हजार मालमत्ता धारकांना वसुली बिले देण्यात येऊन मालमत्ता धारक व पाणी पट्टी देयक पोटी 31 मार्च अखेर शास्ती वर 80 टक्के सुट देण्यात आली असून अनेक मालमत्ता धारकांनी लोक अदालत मध्ये पाणी व मालमत्ता करापोटी 64 लाख रुपये कर भरला होता तर अनेक मालमत्ता धारकांनी आँनलाईन कर रक्कम भरणा केला आहे.

सिडको येथील कार्यरत पथकाने अनेक ठिकाणी थकबाकी पोटी मालमत्ता जप्त करण्यासाठी गेले असता काहींनी रोख रक्कम व धनादेश व्दारे जमा केल्या आहेत.गतवर्षी 9 कोटी 10लाख रूपये वसुली झाली होती यावेळी कर्तव्य दक्ष सहाय्यक आयुक्त यांनी गेल्या सहा महिन्यांपासून संबंधित कर निरीक्षक व वसुली लिपीक यांना दिलेल्या वसुली साठी दिलेल्या माहितीनुसार नियोजन करून यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत 11कोटी रूपये वसुली केली आहे.
