कंधार, सचिन मोरे| तालुक्यातील शेकापूर येथील विद्यमान सरपंच संजय भुस्कटे यांचे चिरंजीव कै. गजानन संजय भुस्कटे यांचा लोहा तालुक्यात भीषण अपघात होऊन जागेवरच मृत्यू झाला होता. ही दुर्दैवी घटना कळताच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी त्यांच्या शेकापूर तालुका कंधार येथील निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले.


याप्रसंगी भुस्कटे परिवाराला वैयक्तिक आर्थिक मदत करण्यात आली. सदर घटने संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वतीने जी काही मदत लागेल याबाबत संबंधित विभागाशी बोलून जास्तीत जास्त मदत भुस्कटे परिवारास मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार चिखलीकर यांनी याप्रसंगी सांगितले.



यावेळी युवा नेते स्वप्निल पाटील लुंगारे, माजी उपनगराध्यक्ष जफरोद्दीन बाहोद्दीन, माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी परदेशी, कंधार खरेदी-विक्री संघाचे चेअरमन किशनराव डफडे, धनाजीराव पाटील दिघे, चेतन केंद्रे, समीर चाऊस, निलेश गौर, राजकुमार केकाटे, मामा गायकवाड, मधुकर पाटील डांगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.




