हिमायतनगर, अनिल मादसवार| संपूर्ण देशभर भगवान श्री मार्कंडेय ऋषींची जयंती मोठ्या भक्तिभावात साजरी होत असताना, हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. बाबुराव कदम पाटील कोहळीकर यांनी भाविकांसाठी आनंदाची व विकासाची मोठी घोषणा केली आहे.


हिमायतनगर येथील मार्केट भागात असलेल्या प्राचीन श्री मार्कंडेय मंदिरात दर्शनासाठी उपस्थित असताना, आमदार कोहळीकर यांनी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी ५० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्याची घोषणा केली. या निर्णयामुळे मंदिर परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांच्या सोयीसुविधांमध्ये मोठी भर पडणार आहे.

विद्यमान आमदार कोहळीकर यांनी जाहिर निधीचा उपयोग पुढील विकासकामांसाठी होणार असून, मंदिर परिसराचे आकर्षक सुशोभीकरण, भाविकांसाठी भक्तनिवास / सभामंडप उभारणी, स्वच्छता, पाणी, प्रकाश व्यवस्था यांसह आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.



यावेळी बोलताना आमदार बाबुराव पाटील कदम कोहळीकर म्हणाले की, “भगवान श्री मार्कंडेय हे संयम, श्रद्धा आणि दीर्घायुष्याचे प्रतीक आहेत. या मंदिराच्या माध्यमातून धार्मिकतेसोबत सामाजिक एकोपा व विकासाला चालना मिळावी, हाच आमचा उद्देश आहे.”
समाजातून स्वागत, नागरिकांकडून आभार
या निधी घोषणेचे मार्कंडेय समाज बांधवांसह हिमायतनगरच्या सर्व नागरिकांनी मनापासून स्वागत केले आहे. आमदार कोहळीकर यांच्या या निर्णयामुळे धार्मिक वारसा जपतानाच विकासाची वाट अधिक मजबूत झाल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. धार्मिक श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि विकासाचा त्रिवेणी संगम साधणारा हा निर्णय हिमायतनगरसाठी निश्चितच मैलाचा दगड ठरणार आहे.


