नांदेड| सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे येथे भौतिकशास्त्र विभागात पीएच. डी.संशोधक विद्यार्थीनी मानसी आदिनाथ इंगोले हिला दक्षिण कोरियाच्या सुंगक्यवान विद्यापीठाने सन्मानित केले.


दक्षिण कोरियातील सुंगक्यकवान विद्यापीठ ( Sungkyukwan University ) येथे संपन्न झालेल्या ‘ ॲडव्हान्सड मटेरियल्स सिंथेसीस, कॅरेक्टरायजेशन ॲन्ड ॲप्लिकेशन(AMSCA-2025) च्या पाचव्या कॉन्फरन्स करिता मानसी इंगोले हिने पाठविलेल्या प्रस्तावानुसार निवड झाल्याचे तिला निमंत्रणपत्र आले होते. त्यानुसार २५ जून ते २७ जून २०२५ या कालावधीत संपन्न झालेल्या परिषदेत ती सामील झाली होती. या परिषदेत विविध देशातील जवळपास सव्वाशे प्रतिनिधी सहभागी झाले होते.


त्यापैकी चार लोकांना प्रेझेंटेशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले . यात नांदेड येथील मानसी इंगोले हिला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. जेष्ठ विचारवंत,साहित्यिक प्रा.डॉ.आदिनाथ इंगोले यांची ती कन्या आहे. या भूषणावह कामगिरी बद्दल तिचे मार्गदर्शक डॉ.संदेश जाडकर आणि सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.


नांदेड येथील माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे,सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ.लक्ष्मण शिंदे,जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभणे,ऍड. कॉ.प्रदीप नागापूरकर,डॉ.हेमंत कारले,सदाशिव गच्चे, कॉ.उज्ज्वला पडलवार. कॉ.गंगाधर गायकवाड, ऍड.प्रशांत कोकणे, एसएफच्या मीना आरसे, जमसंच्या जिल्हाध्यक्षा कॉ. लता गायकवाड, कॉ. करवंदा गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, कॉ. जयराज गायकवाड आदींनी तिचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यास सदिच्छा दिल्या.


