किनवट, परमेश्वर पेशवे| मराठवाड्यातील अतिदुर्गम व मागासलेला भाग म्हणून किनवटसह नांदेड जिल्ह्याकडे पाहिले जाते अशा या किनवट आदिवासी बहुल भागासह नांदेड जिल्ह्या हा कुपोषण मुक्त करण्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी संकल्पना आखली आणि कुपोषण मुक्त अभियान नुकतेच हाती घेतले.


या अभियाना अंतर्गत नांदेड जिल्ह्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षिका. स्टॉप नर्स, आणि कलर्क, तसेच समुदायक आरोग्य अधिकारी यांना कमी वजनाचे बालक, कुपोषण, स्तंनदा माता, गरोदर माता, आणि पोषण आहार या विषयी प्रथम माहिती देवून त्यांना प्रशिक्षण दिले असता किनवट तालुक्यातील कोठारी, उमरी बाजार, दहेली तांडा, राजगड, बोधडी, जलधरा, इस्लापूर, शिवनी, आपरापेठ.



अशा नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रासह किनवट शहरातील नागरी दवाखाना, व किनवट गोंकुदा येथील उपजिल्हा रुग्णालय , आरोग्यवर्धिनी केंद्र इस्लापूर,येथे 855 प्रशिक्षण परीक्षार्थीं पैकी 767 परीक्षार्थी कर्मचाऱ्यांनी मोबाईल ॲप द्वारे ऑनलाईन परीक्षा दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी किशन गायकवाड यांनी दिली. व प्रशिक्षक म्हणून डॉक्टर हिरानी मॅडम व तालुका आरोग्य अधिकारी यांनी काम बघितले.




