लोहा l लोहा शहरात ढगफुटी सदृश्य पावसामुळे पुराने हाहाकार उडाला जुन्या शहरासह गोल्डन सिटी, सिध्दार्थनगर येथे घरात पाणी गेले काही भागात दुचाकी, चार चाकी, पाण्याचे टँकर वाहून गेले.अनेकांच्या घरात पाणी साचले या भागात सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी भेट दिली लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तसेच जायकवाडी भागात पाहणी केली त्यानंतर आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी तहसील कार्यालयात तहसीलदार, मुख्याधिकारी व कर्मचारी यांनी बैठक घेतली व पूरग्रस्त भागात जेवण व्यवस्था ,राहण्याची व्यवस्था तसेच पंचनामे करण्याचा सूचना दिल्या.


लोहा शहरात शुक्रवारी भल्या पहाटे दोन वाजल्या पासून ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला.सकाळी साडे पाच सहा वाजे पर्यंत झालेल्या पावसामुळे जुन्या शहराला पुराचा वेढा पडला तर शहरातून वाहणाऱ्या दोन्ही नदीला पूर आला जुन्या भागातील कलालपेठ, साठे गल्ली, विस्तारीत पवार गल्लीचा भाग, गोल्डन सिटी जायकवाडी वसाहतीचा परिसर या भागात पुरमुळे घरात पाणी गेले.

जीवनोपयोगी साहित्य वाहून गेले गोल्डन सिटी भागात चार चाकी, दुचाकी वाहून गेले हीन नैसर्गिक आपत्त उदभवली ढगफुटीमुळे हाहाकार उडाला त्या भागात सकाळीच आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पूरग्रस्त भागात गेले जुन्या शहरातील कलालपेठ, साठे गल्ली , जायकवाडी परिसर भागात नागरिकाच्या झालेल्या नुकसानीचे पाहणी केली. आपल्या सोबत मी आहे काळजी घ्या.सुदैवाने या पुरात कोणीही जीवितहानी झाली नाही .प्रशासन व पदाधिकारी आपल्या मदतीला आहेत. जीवनावश्यक साहित्याचे नुकसान झाले घरात पाणी गेले ,घर पडले, त्याचे पंचनामे करावेत असा सूचना प्रशासनास दिल्या.


शहरातील वेगवेगळ्या भागात पाहणी केल्या नंतर आमदार चिखखलीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला लोहा शहरात पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती व नुकसान याची माहिती दिली सर्वोतोपरी मदत करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आश्वासित केले त्यावर तहसील कार्यालयात आमदार प्रतापराव पाटील यांनी तातडीची बैठक घेतली व काही महत्त्वाच्या सूचना दिल्या.

तहसील कार्यालयात तहसीलदार विठ्ठल परळीकर, मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे, नायब तहसीलदार अशोक मोकले. माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, केशवराव मुकदम , रामराव सूर्यवंशी, छत्रपती धुतमल, करीम शेख , भास्कर पाटील, अनिल धुतमल,पोलीस निरीक्षक आयलाने, बी डी जाधव ,तलाठी गाढे पाटील, यासह पदाधिकारी उपस्थित होते.
पूरग्रस्त भागात जेवण व्यवस्था
पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे त्या कुटुंबियांना जेवण व्यवस्था करावी असा सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिल्या दुपारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी या भागात खिचडीची व्यवस्था केली तसेच कारेगाव लोहगड गुरुद्वारा पुन्हा एकदा संकटात सापडलेल्या कुटुंबाच्या मदतीला धावून आले त्यांनी जेवणाची व्यवस्था केली.मुख्याधिकारी व त्याच्या टीमने पूरग्रस्त भागात जाऊन लोकांना भोजन वाटप केले

