हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव शहर व तालुक्यात राजकीय वरदहस्त असलेल्या भू- माफीया रेती माफीयासह गौणखनिज चोरट्यांचिंच चलती आहे. यावर आळा घालण्याचे मोठे आव्हान हदगाव तालुक्याचे नूतन महीला तहसिलदार सुरेखा नांदे यांच्यासमोर आहे. यावर त्या कशी मात करणार याकडे हदगाव तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागून आहे. नुकतंच त्यांनी हदगांव तहसिल कार्यालयाच पदभार घेतला आहे.
हदगाव तहसिल कार्यालयाचे तात्कालिन तहसीलदार विनोद गुड्डमवार यांची विधानसभा निवडणूक आयोगाच्या अनुषंगाने त्यांची बदली नांदेड जिल्ह्यात भोकर तालुक्यात झालेली आहे. हदगाव शहरासह तालुक्यात शासकीय गायरान जमीनी अनेक राजकीय व धनदांडग्यांनी गिळंकृत केल्या आहेत. त्यापैकी प्रामुख्याने हदगाव शहरातील गट क्र २२६ मधील शासकीय जमीनी अनेकांनी हडपलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे.
जिल्हाअधिकारी भारुड यांनी हिम्मत दाखवली होती …
हदगाव तालुक्यात हदगांव नगरपरिषदेला २०१७-१८ च्या दरम्यान परिक्षाविधीन नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा जिल्हाधिकारी भारुड यांनी काही दिवसाकरिता नगरपरिषदेचा पदभार घेतला होता. त्यानी शहरातील गायरानच्या जमीनी, निजाम कालीन तलाव शहरात न.पा.चे भूखड अतिक्रमाणाच्या तावडीतुन मुक्त केल्या. त्यावेळेचे तात्कालिन तहसिलदार यांना शहरातील गायराना जमिनी ज्यांनी बळकवलेल्या आहेत. अश्या भू-माफीयावर फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून आदेशित केले होते. हदगाव शहराच गायरानचे प्रकरण थेट मञ्यालय पर्यत गेले होते. मात्र त्यावेळी परिक्षाविधीन नगरपरिषदचे मुख्याधिकारी तथा जिल्हाआधिकारी भारुड यांनी एका आयएएस अधिकाऱ्याचे काय अधिकार असतात. हेच हदगाव शहराच्या भु -माफीयाना अल्पकाळात त्यांनी दाखवून दिले होते. अंडी त्यामुळे नगरपरिषद कार्यालयाचा चेहरा मोहरा बदला हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
हदगाव तहसिल कार्यालयाचे गौणखनिज विभाग नेहमी चर्चेत
हदगाव तालुक्यात शासनाचे रेतीचे धोरण साफ फेल करण्यामागे स्थानिक पातळीवर कोण आहेत. हे शोध घेतल्यानंतर दिसुन येईल. अप्रत्यक्षपणे रेती माफीयां गौण खनिज विभागाकडुन तर अप्रत्यक्षपणे राजकीय दबाव असतो. यामुळे येथील काही रेती तस्कर गौणखनिज चोरटे कुण्याती राजकीय सघटना किवा राजकीय नेत्याशी संबंधित असतात. यामुळे प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी जरा दबकुनच असतात. त्यामुळे नुतन महीला तहसिलदार यांना गौणखानिज विभागावर तहसिलदारांना विशेष लक्ष द्यावे लागणार आहे.
सध्या हदगाव शहरात व तालुक्यात रेतीमाफीयांची चलती आहे. हदगाव तालुक्यात रेतीचा उपसा कागदोपत्री बंद आहे. इतकेच काय घरकूल लाभार्थींना रेती मिळणे कठीण झालेले आहे. याचा फायदा रेती माफीया उचलत आहेत. दुसरी गंभीर बाब अशी की, स्थानिक पोलिस यंत्रणेचा या रेती माफीया अप्रत्यक्षपणे पाठबळ मिळत असल्याने तालुक्यातील नद्यातुन रात्रंदिवस उपसा सुरु आहे. शहरातील काही हॉटेल, धाबे हप्ते वसुलीचे केंद्र बनले असल्याची कुजबुज ऐकावयास मिळत आहे. प्रशासनाच्या अश्या कार्यशैलीमुळे हदगाव तालुक्यातील जनता वैतगालेली आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकाचे घराचे स्वप्न धूसर बनत चालले असून, आगामी विधानसबाह निवडणुकीच्या मतदानावर याचा परिणाम दिसून येणार आहे.