नांदेड| विद्युत महावितरण विज तांत्रिक कामगारांचा नांदेड येथील शालिमार फंक्शन हॉलमध्ये केंद्रिय सभा व तांत्रिक कामगारांचा मेळावा १९ ऑक्टोबर रोजी भव्य दिव्य सभेसह मेळावा संपन्न झाला कामगारांच्या विविध प्रश्नावर विविध मान्यवरांनी आपले मत या मेळाव्यात व्यक्त केले.
या कार्यक्रमात प्रमुखचे मुख्य अतिथी व उद्घाटक सतीश चव्हाण, (संचालक संचलन, महापरेषण कंपनी, प्रकशगंगा, मुंबई) प्रमुख श्री अनिल डोये मुख्य अभियंता नांदेड, नासीर खदरी मुख्य अभियंता औरंगाबाद, सुंदर लटपटे मुख्य अभियंता लातूर, पवनकुमार कछोट मुख्य अभियंता औरंगाबाद आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
या परिषद मेळाव्यामध्ये दि.११ ते २० डिसेंबर २०२४ दरम्यान व संघटनेचा २७ वा वर्धापन दिन आहे, आणि याच दिवशी महाअधिवेशन कोकणात सिंधुदुर्गात घेण्याबाबत चर्चा झाली व सर्वानुमते ठराव पारित करण्यात आला. व कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर अनेक मान्यवरांनी आपले प्रस्ताव मांडले विचार विनिमय झाले अनेक प्रस्ताव पण सर्वांमध्ये पारित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भाकरे पाटील हे होते कार्यक्रमाचे संयोजक सय्यद जहिरोद्दिन सरचिटणीस म. रा.वी.ता. कां. संघटना, शेख मुजीब रा. संघटन सचिव म. रा.वी.ता. कां. संघटना, यावेळी मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती या सह अधिकारी महिला कर्मचाऱ्यांची लक्षणीय उपस्थिती होती. मेळाव्याची सभा संपल्यानंतर सुरुची भोजनाचा स्वाद उपस्थितांनी घेतला. या मेळाव्यात नांदेड सह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होत पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले बॅग इतर साहित्य पण भेटवस्तू देण्यात आली.