उस्माननगर, माणिक भिसे। नांदेड जिल्हा पोलीस दलात आगळा वेगळा ठसा उमटविणाऱ्या कर्तव्यदक्ष आणि उस्माननगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव ( कुबडे ) यांना राज्यपाल सि.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ( खेळ ) शारीरिक या विषयात पीएचडी देऊन गौरविण्यात आले.यावेळी जिल्ह्यातील नामवंत पदाधिकारी उपस्थित होते.


स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या २७ व्या दीक्षांत समारंभ विद्यापिठाच्या दीक्षांत मंचावर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा विद्यापिठाचे कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या सह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. नांदेड जिल्हा पोलिस दलात सेवा करत करत मिळालेल्या प्रेरणेतून व वेळेतून सतत जिद्द आणि आत्मविश्वास , मेहनत करून शारीरिक या विषयात पदवी प्राप्त केली.

आपल्या खेळाच्या जोरावर पोलीस दलात आलेल्या लोपामुद्रा दत्तराव आनेराव ( कुबडे )यांनी अनेक स्पर्धा गाजविल्या त्यांनी दिनांक ११एप्रिल २०१९ रोजी पिएचडी पदवी मिळविण्यासाठी महाविद्यालयीन लघु अंतर धावणाऱ्या स्पर्धेतील सहभागी महिला खेळाडूंच्या व्यक्तिमत्व आत्मविश्वास व निवासी परिसर यांचा क्रीडा कार्य कार्यक्रमांना तर होणा-या परिणामाचा अभ्यास या विषयाची नोंदणी केली. त्यांचे मार्गदर्शन डॉक्टर आश्विन बोरीकर हे आहेत. पोलीस विभागात काम करताना त्यांचे लग्न पोलीस आमलदार सुशिल कुबडे यांच्या सोबत झाले त्यांना दोन पुत्र आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील २७ व्या दीक्षांत समारंभात कुलपती तथा महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला या कार्यक्रमात विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष तथा सावित्रीबाई फुले विद्यापीठातील प्राध्यापक भूषण पटवर्धन यांची प्रमुख उपस्थिती होती तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवा वाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चारसकर यांच्या नेतृत्वात दि.२९ जानेवारी रोजी श्रीमती लोपामुद्रा आणि त्यांचे पती सुशिल कुबडे यांनी लोपामुद्राला प्राप्त झालेले पिएचडी ही पदवी प्रदान केली . सध्या ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर उस्मानगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत आहेत.

पीएचडी प्राप्त करणाऱ्या लोपामुद्रा यांचे नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड ,खंडेराव धरणे ,अप्पर पोलीस अधीक्षक भोकर, सुरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक नांदेड, सुशीलकुमार नायक ,उपविभागीय पोलिस अधिकारी ,इतवारा नांदेड ,श्रीमती अश्विनी जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार, उस्माननगर पोलीस स्टेशने सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार, गजानन गाडेकर पोलीस उपनिरीक्षक ,सुनिल सुर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक , पोलीस कर्म चारी शिवजुजे ,अनिरूद्ध वाडेकर ,पवार ,बाळासाहेब मस्के , बलवंत कांबळे ( चालक ), राम टेकाळे,नामदेव , हंबर्डे मगदूम,ठाकूर, चव्हाण, रेजितवाड ,अप्पाराव , सुनिल कुबडे,श्रीमती भाटकुळे ,श्रीमती डोळे ,श्रीमती वाघमारे श्रीमती तारू , उध्दव घोरबांड ,बाबाराव सोनसळे , ज्योती सांगवीकर ( ईसादकर ) सोनखेड पोलीस कर्मचारी , यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
लोपामुद्रा आनेराव यांनी पाच ते सहावेळेस गोल्ड मेडल मिळविले आहे.महाराष्ट्र चॅम्पियन्सशिप मिळविली आहे.दि. २५ जुलै २००६ मध्ये पोलीस दलात भरती झालेत तर २००९ मध्ये पोलीस नाईक म्हणून बडती मिळाली ,२०१०मध्ये ऑल इंडिया स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून पोलीस हवालदार हे पद मिळविले तर २०१० साली पोलीस पदकानी सन्मानित करण्यात आले.
२०२१ मध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बडती मिळाली . यापुर्वी वजिराबाद ,शिवाजीनगर व महिला सहाय्य कक्ष नांदेड येथे कार्यरत होते.व सध्या उस्माननगर येथे कार्यरत आहेत .पोलीसाची नौकरी करत ,घरसंसार सांभाळून आपल्या मुलाकडे व परिवाराकडे लक्ष देवून कष्टाने २०२४ मध्ये शारीरिक शिक्षण या विषयावर पीएचडी प्राप्त केली आहे.