लोहा| लोहा शहराला शतकोत्तर गणेशोत्सवाची आणि नाट्य संस्कृतीची परंपरा होती.पण बदलत्या सामाजिक व्यवस्थेत गेल्या दीड दोन दशका पासून ही परंपरा हळूहळू कमी होत गेली या दशकात तर शहरातील गणेश मंडळ आपापल्या सोयीनुसार अनंत चतुर्थीला विसर्जन करत आहेत.गतकालीन नाट्य परंपरा ना पुढे सुरु राहिली नाही त्या परंपरेला पुस्तक रूपाने शब्दबद्धकेले गेले.नाट्य लेखक आणि त्याच्या कलावंताची आजच्या पिढीला।माहिती नसावी.नाट्य मंडळ ते विधिमंडळ असा प्रवास करणारे माजी आमदार रोहिदासराव चव्हाण व त्याच्या सोबत काम करणाऱ्या नाट्यकर्मीचा इतिहास जपण्याची गरज आहे.

लोहा शहरात शाहीर अण्णा चव्हाण,यांचे प्रेरणा नाट्य मंडळ , नाट्यलेखक शेषराव कहाळेकर -माजी आमदार रोहिदासराव चव्हाण याचे नवयुवक नाट्य मंडळ, नाट्य लेखक अशोक किलजे -मुकुंद माळवदकर -रत्नाकर पारेकर याचे त्रिमूर्ती नाट्य मंडळ प्रसिद्ध होते.त्या काळात आजच्या सारखे हातात मनोरंजन व सोशल मीडिया नव्हती. त्यावेळच्या सामाजिक राजकिय परिस्थितीवर भाष्य करणारे नाटक गणेशोत्सव काळात लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करत होते.

हिरा नाट्य मंडळ व पुढे तमाशा मंडळ याच भूमीतून उभे राहिले.कलावंत व कलेचा आदर करणाऱ्या या भूमीत व्यंका पाटील पवार, दकोंडवार, पाहिले नगराध्यक्ष माणिकराव पाटील, माजी सभापती विठ्ठलराव पवार, माजी सभापती व्यंकटराव मुकदम ,माजी आ रोहिदास चव्हाण, माजी सरपंच डॉ ग सो गुंडावार, माजी सरपंच यशवंतराव चव्हाण ,कल्याणराव सूर्यवंशी,, माणिकराव मुकदम , बाळाजी पाटील पवार, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव हामदे कोंडावार, , ऍड के एम पवार, रामभाऊ चांनावार , जेष्ठ नाट्य लेखक लक्ष्मण राव संगेवार, भैय्या भागवत , शेषराव काहलेकर अप्पाराव चव्हाण, शेषराव चव्हाण , अशोकराव किलजे सर, संभाजीराव धुतमल, , पेनूरकर , अशोक संगेवार, आनंद बोनागिरे, विष्णू लोखंडे, शाहीर ढवळे, ढोलकीपटू डिंगबर महाबळे, पांडुरंग महाबळे काशीराम पांचाळ, विठ्ठल महाबळे , आडगावकर गुरुजी, असे अनेकांनी एकजुटीने आलेल्या अडचणीवर मात करत नाट्य चळवळ फुलवली .

पण नंतरच्या काळात रसिकांची अभिरुची बदलली आणि हळूहळू या गणेशोत्सव काळातील नाटक बंद पडले.लक्ष्मणराव संगेवार हे लोह्याच्या रंगमंच व नाट्यचळवळी बाबतअनेकदा लिहत असतात. तर ” झुंज तुझी माझी”असे राजकीय मैदानात पात्र उठविणारे सिने कलावंत अनिल मोरे हे लोह्याच्या नाट्य परंपरेच्या प्रसंगानुरूप अनेक आठवण आजच्या पिढीला सांगत असतात. लोहयात गणेश महासंघ होता.व्यंकटराव मुकदम, ऍड के एम पवार, किलजे गुरुजी, बी डी जाधव व त्याची टीम होती त्यानंतर केशवराव मुकदम हे गणेशमहासंघाचे अध्यक्ष झाले.
शहरात सर्व गणेश मंडळात समन्वय होता विसर्जन पूर्व संध्येला देखावा करायचे शहरातील सर्व लहान थोर हे देखावे पहाण्यासाठी जायचे .बारा वर्षा पूर्वी तत्कालीन नगराध्यक्ष किरण वट्टमवार, रामभाऊ चांनावार ,केशवराव मुकदम, वसंतराव पवार, प्रा धनंजय पवार, हरिभाऊ चव्हाण,शरद पाटील पवार, दिनेश तेललवार, अशोकराव संगेवार, संजय मक्तेदार यांनी” लोहा गणेश फेस्टिव्हल” घेतला व त्यानंतर एकही सार्वजनिक कार्यक्रम झाला नाही यंदा आमदार प्रतापराव पाटील यांनी लोहयात तीन दिवस संस्कृती कार्यक्रम घेण्याची तयारी केली पण पूरपरिस्थितीमुळे ती स्थगित झाली.
नाटकाची व गणेशोत्सवाची शतकोत्तर परंपरा असलेल्या लोहा शहरात गणपती बसविणे आणि विसर्जन करणे असेच सुरु आहे .कोणतेही संस्कृती वा धार्मिक कार्यक्रम होत नाहीत .शहरातील सर्व प्रमुखांनी एकत्रित येऊन पुन्हा शहराचे सांस्कृतिक वैभव उभे करण्याची गरज आहे.

