किनवट,परमेश्वर पेशवे। नांदेड जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी किनवट तालुक्यातील चार भाजप पदाधिकाऱ्यांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर घेण्यासंदर्भात दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी नांदेड जिल्हा अधिकारी व सचिव यांना पत्र पाठवून सदरील चार पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासंदर्भात कळविले.


आदिवासी दुर्गम भाग असलेल्या किनवट तालुक्यातील एकाच वेळी चार सदस्यांना नियोजन समिती घेण्याची ही पहिलीच वेळ असावी आतापर्यंत कुठल्याही शासनाने किनवट तालुक्याला या पद्धतीचा न्याय दिला नव्हता त्यामुळे भाजपा कार्यकर्त्यांमध्येआनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. यामध्ये खालील भाजप पदाधिकाऱ्यांचा समावेश असून महिला पैकी संध्याताई प्रफुल राठोड, दिनकर बाबुराव चाडावार, व बाळकृष्ण देवराव कदम, अशोक मुकुंदराव नेमानिवार या चौघांची नांदेड जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागली असून तालुक्याच्या व ग्राम स्तरावरच्या विकासासंदर्भात कार्यकर्त्यांच्या या पदाधिकाऱ्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.


त्यातच विधानसभा निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने या चारही लोकांकडून भाजपच्या उमेदवाराला कितपत फायदा होईल व कुठला पदाधिकारी भाजपाच्या पारड्यात जास्तीचे मतदान टाकेल याकडे आता या भागातील जनतेची लक्ष लागले आहे. निवडणुकीपूर्वी झालेल्या या नियुक्त्या नुसता फार्स ठरू नये व या नियुक्त्या कागदोपत्रीच राहू नये या नियुक्त्याच्या माध्यमातून विकासाच्या कामासाठी चालना मिळावी ही अपेक्षा या मतदारसंघातील जनतेकडून व्यक्त केल्या जात आहेत .




