HomeनांदेडLaw is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष...

Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो – विलास भालेकर

नांदेड | टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान आज दिनांक 20 जुलै 2025 रोजी महात्मा फुले चौक आय.टी.आय. नांदेड येथे मा.पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार साहेब, वाहतूक पोलीस निरीक्षक साहेबराव गुट्टे, साहेब, प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) जमादार सय्यद साहाब, अरदवाड साहेब, जिल्हाध्यक्ष शेख अहेमद ऑटोरिक्षा चालक व टायगर चे सदस्य संपन्न झाला या सोहळ्यामध्ये रस्ता सुरक्षा अभियान जनजागृती राबविण्यात आली.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अभिन्न अंग असलेला ऑटोरिक्षा चालक हा नेहमीच टीकेचा धनी असतो. ओव्हरसीट वाहतूक, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारा अशी त्याची प्रतिमा सामान्य नागरिकात आहे. त्याची हि प्रतिमा पुसण्यासाठी टायगर ऑटोरिक्षा संघटनेने ऑटोरिक्षा चालकात वाहतुकीबाबत जनजागृती व्हावी, यासाठी वाहतूक सुरक्षा आयोजन केले आहे.

टायगर संघटनेचे मार्गदर्शक मा. विलास भालेकर व प्रदेश अध्यक्ष अहेमद (बाबा) यांच्या नेतृत्वात झालेल्या या जनजागृती दि. 20 में जुलै रोजी नांदेड दिनांक 09/06/2025 रोजी पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांच्या हस्ते वाहतूकीचे फलक जन जागृती शहरातील महत्वाच्या उप विभागीय पोलीस अधिक्षक नाईक साहेब, इतवारा वाहतूक प्रभारी पोलीस हिंगोले साहेब व देगलूर नाका सिडको, रेल्वे स्टेशन,माहात्मा फुले चौक प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झाले.

IMG 20250720 WA0026 Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो - विलास भालेकर

वाहतूक सिग्नल चे पालन करा, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नका, कागदपत्रे अद्यावत ठेवा, गणवेश घालून व्यवसाय करा, स्टॉप लाईन मागे थांबा, ओव्हरस्पिड वाहतूक करू नका, रॉंग साईड वाहन चालवू नका , प्रवाशांसोबत सौजन्याने वागा , कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल,असे पत्रके घेऊन टायगर ऑटोरिक्षा संघटनेच्या अध्यक्ष, पदाधिकारी, सभासदांनी आज लग्न समारंभ नवरी नवरदेव यांच्या हातात फलक देऊन जनजागृती अभियान राबविले महत्वाच्या ट्राफिक सिग्नलवर उभे राहून ऑटोरिक्षा चालकांमध्ये जनजागृती तर केलीच पण सोबत त्या चौकातील वाहतूक व्यवस्था सुद्धा सांभाळली. या मोहिमेची सुरवात इतवारा वाहतूक पोलीस स्टेशन येथून झाली होती. जनजागृती मोहिमेला ऑटोरिक्षा चालक आणि सर्वसाधारण नागरिकांनी सुद्धा वाहतूक नियमांचे पालन करून प्रतिसाद दिला.

IMG 20250720 WA0027 Law is supremo : कायदा सर्वोपरी , जनहितार्थ, कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटो रिक्शा चालक असतो - विलास भालेकर

 

सर्व महत्वाचा चौकात जनजागृती अभियान राबविल्यानंतर सभासदांनी एक दिवस रेल्वे स्टेशन आणि बस स्टॅन्ड येथील ऑटोरिक्षा चालकांत सुद्धा जनजागृती केली. कायदा सर्वोपरी असतो , जनहितार्थ असतो , कायद्याचे पालन करणारा कर्तव्यदक्ष असतो . व्यवसाय करतांनी प्रत्येक ऑटोरिक्षा चालकांनी नियमाचे पालन करावे. असे मा. अहेमद (बाबा )ऑटोरिक्षा चालक नियमाने गणवेश घालून व्यवसाय करतांनी दिसले , त्यांना मी नियमाचे पालन करणारा कर्तव्यदक्ष ऑटोरिक्षा चालक आहे मला याचा अभिमान आहे ! असे प्रेषित बॅच कार्ड देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले .

टायगर ऑटोरिक्षा चालक संघटनेचेप्रदेश अध्यक्ष यांनी यावेळी अनेक ऑटोरिक्षा चालकांसोबत मैत्रीपूर्ण संवाद साधला. या जनजागृती अभियानाला यशस्वी करण्यासाठी टायगर ऑटोरिक्षा चालक संघटना महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष अहेमद (बाबा) , जिल्हा अध्यक्ष शेख अहेमद, शहर अध्यक्ष मुखिद पठाण , शहर उपाध्यक्ष पिंटू गजभारे, वसियोदिन इनामदर, शेख अस्लम, शेख सलीम, केशव कदम ,माधव कुदळकर, साहेबराव, सरदार काजी, आयुब भाई आदी पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments