नांदेड| जिल्ह्यातील बिलोली तालुक्यात येणाऱ्या पोलीस ठाणे कुंडलवाडी यांनी शासनाने बंदी घातलेल्या अवैध गुटखा वाहतूक करणारे वाहनासह इसमास ताब्यात घेवुन त्यांच्याकडून 6 लक्ष 34 हजार 910 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत अवैध गुटख्याची वाहतुक करून चोरटी विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याबाबत पोस्टे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने दिनांक 01.03.2025 रोजी सपोनि ज्ञानेश्वर शिंदे, पोस्टे कुंडलवाडी यांना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, बिलोलीकडुन एक लाल रंगाची स्विफ्ट डिझायर कार क्रमाक एमएच-05/एजे-8096 मधुन चोरटया बाजारात विक्री करण्याकरीता गुटख्याची वाहतूक करीत असुन, सदर वाहन हे बिलोलीकडुन कुंडलवाडीकडे येत आहे. त्यावरून कुंडलवाडी येथील पोलीस पथकाने रोडवर सापळा रचुन सदर वाहन त्याब्यात घेवुन चौकशी केली असता कार चालकाने बिलोली येथील इसमांकडुन विना परवाना बेकायदेशिररित्या शासनाने प्रतिबंधत केलेला विविध कंपणीचा गुटखा किंमती 3,24,910/- रू व कार आणि मोबाईल असा एकुण 6,34,910/- रू चा मुद्देमाल पंचासमक्ष ताब्यात घेतला.

तसेच आरोपी 1. शेख वाजिद शेख मंजुर अहेमद, वय 36 वर्षे, व्यवसाय कार चालक, रा. गुंठा गल्ली धर्माबाद ता. धर्माबाद, 2 अब्दुल फेरोज अब्दुल वाहब, रा. इनामदार गल्ली बिलोली ता. बिलोली जि. नांदेड यांच्यावर कायदेशिर कारवाई करून आरोपीतां विरूध्द कलम 223, 275, 123, भा.न्या.सं-2023 सह कलम 26 (2) (1), 26 (2) (4).27 (3) (ई), 3 (1) (झेड). (4), 30(2) सह कलम 59 अन्न सुरक्ष आणि मानके कायदा 2006 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

हि कार्यवाही अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड (IPS), खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक, भोकर,सुरज गुरव, अपर पोलीस अधिक्षक, नांदेड, संकेत गोसावी, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग देगलुर चार्ज धर्माबाद यांचे मार्गदर्शनाखाली, ज्ञानेश्वर शिंदे, सपोनि ने. पोस्टे कुंडलवाडी, पोहेकों. माधव पाटील, पोकों रामेश्वर पाटील, रघुविरसिंह चव्हाण, होमगार्ड अंकुश ईरेवाड, ईस्माईल पठाण, महेश अदमनकर, आकाश गायकवाड, ज्ञानेश्वर रामपुरे, शेख गौस, लिंगुराम गुरूपवार, महीला होमगार्ड सुप्रिया बोलचेटवार, सर्व ने. पोस्टे कुंडलवाडी यांनी केली आहे. सदर उत्कृष्ट कामगीरी बाबत पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कुंडलवाडी पोलीस पथकाचे अभिनंदन
