हिमायतनगर| तालुक्यातील दुर्गम गावापैकी असलेल्या किरमगाव येथिल जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांनी दि. ६ गुरूवारी शाळेला दांडी मारून दिवसभर शाळा बंद ठेवली, ऐनकेन कारणाने शाळा बंद राहत असल्याने पालकांत कमालीची नाराजी आहे. परिणामी विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळत आहे.


राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ आय वरून अगदी दोन किलोमीटर अंतरावर वाघी ग्रामपंचाय हद्दीत किरमगाव आहे, रस्ताही बऱ्यापैकी आहे, येथे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परीषदेची शाळा आहे, मात्र येथिल शाळेचे शिक्षक गाव आडपेटेला आहे, कोणी अधिकारी फिरकत नाही अगदी हेच हेरून मिटींग आहे, टपाल पोचवायच आहे, पत्र द्यायच आहे अशी वेगवेगळी कारणे दाखवत शाळेला दांडी मारतात, कधी दुपारीच गायब होतात. हे प्रकार नेहमी एैकायला मिळत असल्याच पालक सांगतात.

उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची भिती लक्षात घेता शिक्षण विभागाने आता शाळा अर्धवेळेवर आनल्यात हि त्यांच्यासाठी जमेची बाजु झाली असावी, म्हणुन की काय? दि. ६ गुरूवारी नेहमी प्रमाणे विद्यार्थी शाळेत वेळेवर आले होते, मात्र सर आले नसल्याने दिवसभर शाळा बंद होती. यात सरच तसुभरही नुकसान होत नाही परंतु विद्यार्थ्यांच शैक्षणिक नुकसान होवुन गुणवत्ता ढासळत आहे.

गेल्या आठवडयात नेहमीच्या शिक्षकाच्या जागी एक शिक्षक नविनच आले होते ते दुपारी झोपी गेल्याच विद्यार्थी घरी आल्यावर आई वडीलांना सांगत होते. पवित्र ज्ञानदानाच काम करणाऱ्या सरच बरोबर आहे की, तेथिल पालकांच चुकत आहे, सत्याचा शोध घेवुन शिक्षण विभाग किरमगावातील विद्यार्थ्यांना न्याय देते की, सदर शिक्षकाची बाजु घेवुन पाठराखन करते हे पाहन आता औत्सुक्याच ठरणार आहे.
