Thursday, May 14

Tag: students return home

Kiramgaon Zilla Parishad : किरमगाव जिल्हा परीषदेच्या सरांनी शाळेला दांडी मारली; विद्यार्थी घरी परत गेले

Kiramgaon Zilla Parishad : किरमगाव जिल्हा परीषदेच्या सरांनी शाळेला दांडी मारली; विद्यार्थी घरी परत गेले

करियर, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील दुर्गम गावापैकी असलेल्या किरमगाव येथिल जिल्हा परीषद शाळेच्या शिक्षकांनी दि. ६ गुरूवारी शाळेला दांडी मारून दिवसभर शाळा बंद ठेवली, ऐनकेन कारणाने शाळा बंद राहत असल्याने पालकांत कमालीची नाराजी आहे. परिणामी विद्यार्थ्याची गुणवत्ता ढासळत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ७५२ आय वरून अगदी दोन किलोमीटर अंतरावर वाघी ग्रामपंचाय हद्दीत किरमगाव आहे, रस्ताही बऱ्यापैकी आहे, येथे पहिली ते चौथी पर्यंत जिल्हा परीषदेची शाळा आहे, मात्र येथिल शाळेचे शिक्षक गाव आडपेटेला आहे, कोणी अधिकारी फिरकत नाही अगदी हेच हेरून मिटींग आहे, टपाल पोचवायच आहे, पत्र द्यायच आहे अशी वेगवेगळी कारणे दाखवत शाळेला दांडी मारतात, कधी दुपारीच गायब होतात. हे प्रकार नेहमी एैकायला मिळत असल्याच पालक सांगतात. उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याची भिती लक्षात घेता शिक्षण विभागाने आता शाळा अर्धवेळेवर आनल्यात हि त्यांच्यासाठी जम...
error: Content is protected !!