नांदेड। कंधार पोलीसांनी गाडी – बेकायदेशीर वाळु वाहतुक करणाऱ्या दोन हायवा गाड्या आणि बेकायदेशीर रित्या दारुची वाहतुक करणारी दुचाकी गाडी पकडली आहे. जप्त केलेल्या सर्व मुद्देमालाची किंमत ५१ लाख २१ हजार ७६० रुपये आहे.
कंधार येथील पोलीस निरिक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक सुधाकर खजे, विकास कोकाटे, पोलीस उपनिरिक्षक अमोल इंगोले, पोलीस अंमलदार एकनाथ घुगे, शेषेराव बारोळे, अमोल गुंडरे यांनी एम.एच.२६ बी.ई.५७९० ही हायवा गाडी बेकायदेशीररित्या भरलेल्या पाच ब्रास वाळुसह जप्त केली. तसेच एम.एच.२६ बी.ई. ६७९० क्रमांकाची वाळु भरलेली हायवा
पकडली. याबाबत संदेश उर्फ लिमट्या अनिल पवार (४५), राजू बळी बोईनवाड (२५) दोघे रा. मारतळा ता. जि. नांदेड यांच्याविरुध्द गुन्हा क्रमांक ३८१, ३८२ दाखल करण्यात आला. तसेच दुचाकी गाडी क्रमांक एम.एच.२६सी. जे.५०१८ पकडली. त्यात बेकायेदशीर रित्या वहन होणारी दारु भरलेली होती. याबद्दली शेख युसूफ शेख पाशा रा. काझी मोहल्ला कंधार याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपमहानिरिक्षक शहाजी उमाप, पोलीस अधिक्षक अबिनाशकुमार, अपर पोलीस अधिक्षक डॉ. खंडेराय धरणे, सुरज गुरव, पोलीस उपअधिक्षक अश्विनी जगताप आदींनी कंधार पोलीसांचे कौतुक केले आहे.