श्रीक्षेत्र माहूर l माहूर शहरात मोकाट बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने अनेक जनावरावर हल्ले होऊन शहरातील मोकाट कुत्रे बिबट्याच्या तडाख्यात नामशेष होत असून कालच मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी सोनापीर बाबा दर्गाह परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचे पत्र देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केलेली असताना आज दि 9 रोजी दर्गाह परिसरातील मोकळ्या जागेत बिबट्याने कालवडीस ठार केल्याची घटना घडल्याने विनोद लक्ष्मण चिरडे यांनी वन विभागाकडे मदतीची मागणी केल्याने खळबळ उडाली आहे.


नागरिकांवर हल्ले होण्याची शक्यता असल्याने मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी कालच दिले होते पत्र बिबट्यांची संख्या वाढल्याने शहरातील मोकाट कुत्रे होत आहेत नामशेष नागरिकावर हल्ला होण्याच्या भीतीने शहरात घबराट

माहूर शहरासह तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठे असल्याने तसेच विनम वन विभागाकडून अद्यावत रेस्क्यू टीम नसल्याने अनेक जनावरे नागरिक जंगली जनावरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडले तर शेकडोच्या संख्येने नागरिक आजपर्यंत जखमी झालेले आहेत अनेक वेळा मागणी करूनही अद्यावत रेस्क्यू टीम माहूरला दिली गेली नसल्याने आता माहूर शहरातील घरादाराच्या दरवाजासमोर बिबट्या डरकाळ्या फोडत असल्याने सहा वाजता शहरात स्मशानवत शांतता पसरत आहे


सोना पीर बाबा दर्गाह परिसरातील मोकळ्या जागेत विनोद चिरडे यांचे सह अनेक नागरिकांची जनावरे चरत असतात या परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने रात्री कालवडीची शिकार झाली सकाळी नागरिकांच्या लक्षात येत त्यांनी गायकीच्या माध्यमातून सदरील वार्ता चिरडे यांना कळविल्याने त्यांनी वन विभागाकडे ऑनलाईन अर्ज दाखल करून मदतीची मागणी केली असून शहरातच बिबट्याने जनावराची शिकार केल्याने नागरिकांत घबराट पसरली असून मुख्याधिकारी विवेक कांदे यांनी दिलेल्या पत्राला या हल्ल्यामुळे दुजोरा मिळाला असला तरी मुख्याध्यापिकाऱ्यांचे पत्र कचरा पेटीत टाकून वनविभागाचे अधिकारी मात्र गोवासह इतर निसर्गरम्य ठिकाणी सहलीला गेल्याची चर्चा शहरभर होत असून नागरिकात घाबराटीचे वातावरण पसरल्याने काम चुकार अधिकाऱ्यांना येथून हाकलत या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी अद्यावत रेस्क्यू टीम माहूरला पाठवावी अशी मागणी नागरिकातून होत आहे


