नांदेड| मुंबई येथील प्रसिध्द सांधेरोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अतुल उत्तमराव तट हे नांदेड येथील रयत रुग्णालयास रविवार दि.31 ऑगस्ट रोजी सदिच्छा भेट देणार आहेत.


नांदेडच्या रुग्ण सेवेत मोलाची कामगिरी करणार्या सोमेश कॉलनी भागातील रयत रुग्णालयात नेहमी वेगवेगळ्या आजारांचे तज्ञ भेट देत असतात. रविवारी दि.31 ऑगस्ट रोजी मुंबईचे सुप्रसिध्द व अनुभवी सांधेरोपन शस्त्रक्रिया तज्ञ डॉ.अतुल उत्तमराव तट हे भेट देणार आहेत.

सकाळी 10.30 ते 1 या वेळेत पुर्व नोंदणी केलेल्या रुग्णांची ते तपासणी करणार आहेत. ज्या रुग्णांना शस्त्रक्रिया आवश्यक असेल अशा रुग्णांची शस्त्रक्रिया ते माफक दरात रयत रुग्णालयातच करणार असल्याचे रयत आरोग्य मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.



