नांदेड| भारत निवडणूक आयोगाने 16-नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा मतदारसंघासाठी सामान्य, खर्च, पोलीस निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी खर्च निरीक्षकासह सामान्य व पोलीस विभागाचे निरीक्षक दाखल झाले आहे. नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती किंवा तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.
सामान्य निवडणूक निरीक्षक
सामान्य निवडणूक निरीक्षक शेलेंद्रकुमार (भाप्रसे) यांची 83-किनवट व 84- हदगाव या विधानसभा क्षेत्रासाठी तर 85-भोकर व 86-नांदेड उत्तर मतदारसंघासाठी बी. बाला माया देवी (भाप्रसे) यांची तर 87-नांदेड दक्षिण- व 88-लोहा मतदार क्षेत्रासाठी श्रीमती पल्लवी आकृती (भाप्रसे) यांची तर 89-नायगाव, 90-देगलूर व 91-मुखेड मतदारसंघासाठी रण विजय यादव (भाप्रसे) यांची सामान्य निरीक्षक म्हणून दाखल झाले आहेत. हे सामान्य निवडणूक निरीक्षक शासकीय विश्रामगृहात निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील.
निवडणूक निरीक्षक कालु राम रावत
विधानसभा निवडणुकीसाठी राजस्थान कॅडरचे 2008 तुकडीचे भारतीय पोलीस सेवेचे वरिष्ठ अधिकारी कालु राम रावत हे नांदेड येथे दाखल झाले आहेत. कालुराम रावत शासकीय विश्रामगृहावर निवडणूक काळात कार्यालयीन वेळेमध्ये सामान्य जनतेसाठी उपलब्ध असतील. त्यांचा निवडणूक काळातील स्थानिक संपर्क क्रमांक 8180830699 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक आशिष बोराडे ( 88888921OO)त्यांच्यासोबत असतील. नागरिकांना नांदेड विश्राम गृहातील व्हीआयपी सूट क्रमांक एक मध्ये त्यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल.
मयंक पांडे किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर व दक्षिणसाठी निरीक्षक
गुजरात कॅडरचे 2009 बॅचचे आयकर विभागाचे वरिष्ठ अधिकारी मयंक पांडे हे सुरत येथे आयकर विभागात अतिरिक्त आयुक्त आहेत. त्यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नांदेड जिल्ह्यातील किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण या विधानसभा क्षेत्राचे खर्च निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली आहे. मयंक पांडे यांचा संपर्क क्र. 08483845220 आहे. तर त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदचे मुख्य लेखापाल शिवप्रकाश चन्ना (मो.नं. 9011000921) आहेत. नागरिकांना आपापल्या विधानसभा क्षेत्राच्या संदर्भातील काही माहिती द्यायची असेल तक्रार असेल तर कार्यालयीन वेळेमध्ये या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटता येणार आहे.
ए गोविंदराज लोहा, नायगाव, देगलूर, मुखेडसाठी खर्च निरीक्षक
तामिळनाडू कॅडरचे चेन्नई येथील ए गोविंदराज यांच्याकडे भारत निवडणूक आयोगाने नायगाव, देगलूर, मुखेड, लोहा या विधानसभा क्षेत्राच्या खर्च निरीक्षणाची जबाबदारी सोपविली आहे. कार्यालयीन वेळेमध्ये त्यांच्याशी नागरिकांना संपर्क साधता येईल. ए. गोविंदराज यांचा स्थानिक संपर्क क्रमांक 7249048040 आहे. त्यांचे संपर्क अधिकारी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास गंगथडे (मोबाईल क्रमांक 9850485332) आहेत. कार्यालयीन कालावधीत त्यांना नागरिकांना भेटता येईल. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे लेंडी कक्ष येथे ते निवडणूक काळात निवासी आहेत.