नांदेड l येथील उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव कुबडे यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजारो येथे आपल्या भारताचा व महाराष्ट्र पोलीस चा झेंडा 15ऑगस्ट रोजी फडकविला आहे. 15 सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/(सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.


पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली .


मुला – मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी मुलीने सन-2000 मध्ये अखिल भारतीय स्पर्धेत रोपे पदक मिळवून गावाचे व जिल्ह्याचे नाव कमविले. खेळायच्या वयात 11 वर्षापासून शेतात, नदीत, टेकडीवर सराव करून राज्यस्तरीय स्पर्धेत 35-40 वेळेस सुवर्णपदक जिंकले,राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 15-20 विजेतेपद मिळवून आपल्या गावाचे नाव व महाराष्ट्राचे नाव उज्वल केले .


सन 2006 महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली.2007 मध्ये महाराष्ट्र पोलीस स्पर्धेत सहा विजेते पदक मिळवून जनरल चॅम्पियनशिप मिळवुन आपले नाव व जिल्ह्याचे नाव केले. लगातार दोन वर्षे अखिल भारतीय स्पर्धेत सुवर्ण, रोपे पदक मिळवून आपल्या राज्याचे व पोलीस दलाचे नाव उज्वल केले तसेच सन 2010 चांगल्या कामगिरीमुळे पोलीस महासंचालक पदकाने जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते सन्मानित केले.

तसेच अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. आपले कर्तव्य निभावत, घरांची जिम्मेदारी सांभाळून दोन मुलाचे पालन करत शारीरिक शिक्षण विषयात PHD प्राप्त केली आहे. हे सर्व करीत असताना सुद्धा खडतड मेहनत करून आज आफ्रिका खंडातील सर्वात उंच असलेले टांझानिया देशातील किलीमांजारो शिखर सर करण्यासाठी रवाना झाले.
आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजारो येथे आपल्या भारताचा व महाराष्ट्र पोलीस चा झेंडा 15ऑगस्ट रोजी फडकविला असुन हा बहुमान मला मिळाला त्यामुळे त्यांनी या गोष्टीचा अभिमान असल्याचे बोले आहे. ज्यांनी ही त्यांना मदत केली त्या सर्वांचे त्यांनी आभार मानले.

