Indian woman ; आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखरावर भारतीय महिलेनी फडकविला राष्ट्रध्वज
नांदेड l येथील उस्माननगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लोपामुद्रा आनेराव कुबडे यांनी आफ्रिकेतील टांझानिया देशातील सर्वोच्च शिखर किलोमांजारो येथे आपल्या भारताचा व महाराष्ट्र पोलीस चा झेंडा 15ऑगस्ट रोजी फडकविला आहे. 15 सौ.लोपामुद्रा दत्तराव आनेराव/(सौ.लोपामुद्रा सुशील कुबडे) नांदेड जिल्ह्यातील रोहिपिंपळगावातील एका गरीब शेतकऱ्यांच्या पोटी जन्म झाला.
पहिली ते चौथी जि.प.शाळा वसंतवाडी ,पाचवी ते सातवी जि.प.शाळा रोहिपिंपळगाव,आठवी ते दहावी कै.यादवरावजी शाळा चिकाळा येथे शिक्षण झाले. पुढील शिक्षण मुदखेड व नायगाव येथे केले.वडीलांना खेळाची आवड असल्याने स्वतः ला स्पर्धेत जाता आले नाही म्हणून, आपली चार एकर शेती पडीत ठेवून स्वतः त्यांची प्रॅक्टिस घेतली .
मुला - मुलीत कुठलाही भेदभाव न करता त्यांनी आपल्या मुलीला मुलाच्या बरोबरीने शेतामध्ये सराव करून घेतला . अवघ्या वयाच्या चौदाव्या वर्षी ...
