नांदेड| नांदेड येथे नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरचे आज शुक्रवार दिनांक 9 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
मालेगाव रोड कॅनल रोड चौक, सालासर कॉम्प्लेक्स मागे तरोडा नाका येथे होणाऱ्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर जिल्हाधिकारी पी. एस. बोरगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदर, विकास माने, डॉ. प्रल्हाद कोटकर, आंबेडकरवादी मिशनचे दीपक कदम, जल ऊर्जा मंत्रालय सल्लागार इथियोपिया हरिभाऊ वाघमारे, समाजसेवक मनीषभाऊ कावळे, सामाजिक कार्यकर्ते संदीपभाऊ ढगे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
महापुरुषांच्या विचाराला अनुसरून नवोदया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व ड्रामा केअर सेंटरव्दारे रुग्ण सेवेचा वसा हाती घेण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती डॉ. श्याम दवणे, डॉ. सुयश शिंदे, डॉ. रोहन सरोदे, डॉ. महेंद्र बर्वे व डॉ. सुप्रिया पेडगावकर-पंडित यांनी केले आहे.