नांदेड़| दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी 35 राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेचे उद्घाटन क्रीडा संकुल यशवंत महाविद्यालय नांदेड येथे सौ.सरस्वती आनंद पाटील बोंढारकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या स्पर्धेला महाराष्ट्रातून जवळपास 300 खेळाडू सहभागी झाले होते. या कार्यक्रमास शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे प्रकाश कटोले राजकुमार सोमवंशी सुहास खराणे पाटील दत्ता गलाले राजू शिंदे केदार ढवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालक डॉ राहुल वाघमारे तर आभार डॉ.रमेश नांदेडकर यांनी मानले. स्पर्धा यशस्वीते साठी डॉ.राहुल वाघमारे राहुल चंदन आकाश मंगल शिवाजी जाधव वैजनाथ नावंदे संगमेश्वर शिंदे रामा जाधव श्याम जाधव यानी परिश्रम घेतले.