हदगाव,शेख चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेञांत एरवी आपल्याच कामात मश्गुल असणारे लोकाच्या समस्या ऐकुण घेवून केवळ कामाचा आव आणणारे काही लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ आता आचनक सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. सध्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या हस्ते हदगाव विधानसभा क्षेञांत शासनाच्या कोट्यावधी रुपायाच्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळे व भुमिपुजनाची सध्यातरी चढाओढ लागलेली आहे. हि कामे पूर्णत्वास जाईल का असा प्रश्न आता सुजाण मदारांना पडू लागला आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय नेत्याकडून होत असलेला खटाटोप मात्र जनतेच्या पचनी पडत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हदगाव विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी कडून वृतमान पञाच्या जाहीरातीत प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक मजकुरामुळे जनतेत संभ्रम व चर्चेचा विषय झाल्याचे दिसुन येत आहे. एका वर्तमान पञाच्या आकर्षक जाहीरातीत एकुण 20 ते25 विविध कामाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. यामध्ये जोड रस्ता, पुल मो-या बाधकाम किमीचा आकडेवारीसह स्पष्ट उल्लेख दिसुन येत आहे. तसेच रोड रुदीकरण लांबी, रुंदीकरण करिता या सर्कल मधील अनेक प्रमुख गावाचा रोडच पण उल्लेख दिसत आहे.
गावाचा मंजुर अंदाजीत निधी लाखात की कोटीत याचा माञ उल्लेख टाळल्याचे दिसत आहे. ह्यात नेमके काय ‘गौडबंगाल “आहे ज्या राजकीय पक्षांच्या काही पदाधिकाऱ्याद्वारे वर्तमानञत मजकूर छापला , त्यांनी किती मंजुर करून आणला आहे हे स्पष्ट व्हायला हवे होते. मात्र निधीचा उल्लेख न करण्यामागचे कारण काय यात काय..? या ‘दडल काय गौडबंगाल ‘आहे या बाबत ही मतदार संघात माञ उलसुलट चर्चा होत आहे.
शेष म्हणजे ह्या विकास कामाचे उदघाटन सोहळा मागील आठवड्यातच लोकप्रतिनिधी च्या हस्ते पार पडला. ह्या उदघाटन दरम्यान कामाच्या मंजुर निधी बाबतीत लोकप्रतिनिधी यानी खुलासा करायाला हवा होता अशी नागरिकांची अपेक्षा होती. कारण सदरील जाहीरातीत दाखविलेले कामे मंजुर झाली असेल तर त्यांचा अंदाजित मंजुर निधी किती आहे हे विकास कामे खरच होणार का..? या बाबतीत सभ्रम माञ जनतेत आहे, करणं मागील निवडणूक काळात पराभूत झालेल्या एका उमेदवाराने निवडणूक पूर्वी असाच उदघाटनाची नारळ फोडण्याचा धमाका केला होता… मात्र त्यांना हसऱ्या क्रमणकाची मते देऊन जनतेनी जागा दाखवून दिली होती… तशीच गत उदघाटनाची धडाका करून घरी बसण्याची तयारी तर हे राजकीय नेते करीत नसली ना..अशी चर्चाही मतदार राजाच्या तोंडून एकिवयास मिळत आहे.
हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार सांघट मागील पंचवार्षिक काळात कोट्यवधींच्या निधीतून रस्ते, सभागृह, बंधारे, पुलमोरे, यासह विविध विकास कामे करण्यात आली. मात्र त्या विकास कामाच्या सुमार दर्जा लोकप्रतिनिधींच्या टक्केवारीमुळे ढासळला आहे. त्यामुळे हि विकास कामे केवळ गुटेंडर, राजकीय नेते, सरपंच, उपसरपंच व दलाल सहाय्यकांना जगविण्यासाठी केले जात असल्याची भावना मतदारांना लक्षात येऊ लागली आहे. केवळ नेत्याच्या मागे राहणारे, गुत्तेदार, चापलुसी कार्यकर्ते, नंबर दोन धंदेवाले रेती चोर, मुरूम चोर, मटका, गुटखा, दारू, जुगार आदी लोकांना सोबत घेऊन चमकोगिरी करणाऱ्या नेत्यामुळे भले झाले आहे. एकूणच राजकीय क्षेत्रात राहून जनतेच्या विकासाच्या नावावर एक प्रकारे शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारणारी लुटारूंची टोळी सक्रिय झाली कि काय…? असा प्रतिप्रश्न आता सुजाण मतदारांना पडू लागला आहे. यामुळे जंनताचा आता अश्या नेत्यांना घराचा रस्ता दाखवून नवा पर्याय शोधात असल्याचे अनेक मतदार बंधू भगिनींच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. ५ वर्ष स्वतःची घरे भरून बैलेंस वाढविणाऱ्या नेत्यांनी किमान आतातरी जनतेची दिशाभूल करू नये अशी माफक अपेक्षा व्यक्त केली जात आहे.