Hadgaon assembly elections : हदगाव विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उदघाटनची चढाओढ; नागरिक संभ्रमात …! – NNL
हदगाव,शेख चांदपाशा| हदगाव विधानसभा क्षेञांत एरवी आपल्याच कामात मश्गुल असणारे लोकाच्या समस्या ऐकुण घेवून केवळ कामाचा आव आणणारे काही लोकप्रतिनिधी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माञ आता आचनक सक्रिय झाल्याचे दिसुन येत आहे. सध्या विविध राजकीय पक्षाच्या नेत्याच्या हस्ते हदगाव विधानसभा क्षेञांत शासनाच्या कोट्यावधी रुपायाच्या विकास कामाच्या लोकार्पण सोहळे व भुमिपुजनाची सध्यातरी चढाओढ लागलेली आहे. हि कामे पूर्णत्वास जाईल का असा प्रश्न आता सुजाण मदारांना पडू लागला आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन राजकीय नेत्याकडून होत असलेला खटाटोप मात्र जनतेच्या पचनी पडत नसल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. केवळ जनतेची दिशाभूल करण्यासाठी हदगाव विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रतिनिधी कडून वृतमान पञाच्या जाहीरातीत प्रकाशित करण्यात आलेल्या आकर्षक मजकुरामुळे जनतेत संभ्रम व चर्चेचा विषय झाल्याचे दिसुन येत आहे. एका वर्तमान पञ...
