नांदेड | प्रजासत्ताक दिन २०२६ च्या औचित्याने नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.


एकूण १३ विभागांनी सहभाग घेतल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमधील संघभावना, आपुलकी आणि समन्वयाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, दोरीखेच, बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

🏆 स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
🔹 क्रिकेट
विजेता – ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक ऑपरेशन्स (TRSO) विभाग
उपविजेता – अभियांत्रिकी विभाग
🔹 व्हॉलीबॉल
विजेता – यांत्रिकी विभाग
उपविजेता – ऑपरेटिंग विभाग
🔹 दोरीखेच
विजेता – रेल्वे संरक्षण दल (RPF)
उपविजेता – कार्मिक विभाग
तृतीय क्रमांक – TRSO विभाग



🔹 बुद्धिबळ (पुरुष)
प्रथम क्रमांक – वाणिज्य विभाग
द्वितीय क्रमांक – TRSO विभाग
🔹 बुद्धिबळ (महिला)
प्रथम क्रमांक – सिग्नल व दूरसंचार (S&T) विभाग
द्वितीय क्रमांक – कार्मिक विभाग
🔹 कॅरम (महिला) – एकेरी
प्रथम क्रमांक – कार्मिक विभाग
द्वितीय क्रमांक – ऑपरेटिंग विभाग
🔹 कॅरम (महिला) – दुहेरी
प्रथम क्रमांक – सिग्नल व दूरसंचार (S&T) विभाग
द्वितीय क्रमांक – ऑपरेटिंग विभाग

या प्रसंगी विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री. प्रदीप कामले यांनी उपस्थित राहून स्पर्धांचा आनंद घेतला. त्यांनी सहभागी खेळाडूंना प्रोत्साहन देत त्यांच्या क्रीडावृत्तीचे कौतुक केले. यावेळी विविध विभागांतील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि त्यांनी स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.
या क्रीडा स्पर्धांमुळे कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती, विविध विभागांतील समन्वय, संघभावना आणि परस्पर समज अधिक दृढ झाली असून, प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचे जनसंपर्क विभागाने कळविले आहे.

