Sports Competitions : प्रजासत्ताक दिन २०२६ निमित्त डीआरएम कार्यालय, नांदेड येथे आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचा उत्साह
नांदेड | प्रजासत्ताक दिन २०२६ च्या औचित्याने नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम) कार्यालयात आंतर-विभागीय क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धांमध्ये विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
एकूण १३ विभागांनी सहभाग घेतल्याने रेल्वे कर्मचाऱ्यांमधील संघभावना, आपुलकी आणि समन्वयाचे सुंदर चित्र पाहायला मिळाले. या क्रीडा महोत्सवांतर्गत क्रिकेट, व्हॉलीबॉल, दोरीखेच, बॅडमिंटन, कॅरम आणि बुद्धिबळ अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
🏆 स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे :
🔹 क्रिकेट
विजेता – ट्रॅक्शन रोलिंग स्टॉक ऑपरेशन्स (TRSO) विभाग
उपविजेता – अभियांत्रिकी विभाग
🔹 व्हॉलीबॉल
विजेता – यांत्रिकी विभाग
उपविजेता – ऑपरेटिंग विभाग
🔹 दोरीखेच
विजेता – रेल्वे संरक्षण दल (RPF)
उपविजेता – कार्मिक विभाग
तृतीय क्रमांक – TRSO विभाग
🔹 बुद्धिब...
