नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील व सिडको हडको शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून गरबा दांडिया खेळात महिलांच्या मोठ्या सहभागाने रात्री उशिरा पर्यंत झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले, यावेळी जागोजागी प्रसाद व पाणी वाटप करण्यात आले तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको हडको असदवन,वाघाळा, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा या शहरी भागात परवाना व विना परवना४७ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी तर ग्रामीण भागातील धनेगाव,वाजेगाव,तुप्पा, विष्णुपुरी, कांकाडी, भायेगाव, यासह ग्रामीण भागात ५० विनापरवाना वपरवाना सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी नोंदणी केली होती.
सिडको व हडको भागातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी आकर्षक वसुबक मोठ्या मुर्ती पर जिल्ह्यातील व हैदराबाद येथुन आणल्या होत्या, सिडको व हडको नटराज दुर्गा, नवयुवक दुर्गा, छत्रपती दुर्गा, वैष्णवी देवी, नवयुवक दुर्गा,श्री सप्तशृंगी देवी,श्री नृसिंह दुर्गा, ओमकार दुर्गा, शिवनेरी दुर्गा, अयोध्या दुर्गा, वैभव नवदुर्गा,त्रिरूपुर वासनी दुर्गा माता महोत्सव,यासह सिडको हडको भागातील विविध दुर्गा महोत्सव यांनी मुख्य सार्वजनिक मिरवणूक मध्ये सहभागी होत ढोलताशांच्या गजरात दांडीया व गरबा खेळत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या,विशेष म्हणजे ढोलताशांच्या गजरात या भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आल्या. मुख्य मिरवणूक मार्गावर पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.