हिमायतनगर | हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालय, हिमायतनगर येथील वाणिज्य विभागाचा विद्यार्थी राजेंद्र यशवंत हनवते यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे ब्लड बँक अटेंडन्ट पदावर नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे महाविद्यालयात आनंदाचे वातावरण आहे.


राजेंद्र हनवते हे महाविद्यालयीन जीवनात अष्टपैलू विद्यार्थी म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक स्पर्धा व उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन विविध पारितोषिके मिळवली आहेत. राज्य शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांनी सातत्याने सहभाग नोंदवला असून, काही वेळा मेरिट यादीत अगदी थोडक्याच फरकाने मागे राहिले. मात्र, त्यांनी खचून न जाता अभ्यास सुरू ठेवत अखेर हे यश आपल्या पदरात पाडून घेतले.


या यशाबद्दल मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा व माजी केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री मा. ना. सुर्यकांताताई पाटील, संस्थेचे सचिव मा. अरुण कुलकर्णी, तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी राजेंद्र हनवते यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.


महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राजेंद्र यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, माझ्या यशात हुजपा महाविद्यालयाचा मोलाचा वाटा आहे. प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम, प्रा. डॉ. गजानन दगडे, प्रा. डॉ. संगपाल इंगळे व प्रा. मिथिलेश शेरकर सर यांचे मला सतत मार्गदर्शन लाभले.

सत्कार समारंभ प्रसंगी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य डॉ. डी. के. कदम, स्टाफ सेक्रेटरी प्रा. एम. पी. गुंडाळे, सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.रा जेंद्र हनवते यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणास्त्रोत निर्माण झाला आहे.


