हिमायतनगर, अनिल मादसवार। गेल्या दोन महिन्यापासून मोठया पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या हिमायतनगर शहर व तालुका वासीयांना शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दरम्यान रविवारी सकाळी 5 ते 7 च्या दरम्यान दमदार पावसामुळे शहरातील 4, 16, 1, 7, 13, 2 सह अनेक प्रभागातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. पावसाचे पाणी घरात शिरल्यामुळे नगरपंचायतीच्या ढिसाळ नियोजनाचे प्रचिती नागरिकांना आली असून, गुडघाभर पाणी घरात असल्याने अनेक गोरगरीब नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. त्यामुळे नागरिकांनी नगरपंचायत प्रशासनाच्या नाकर्तेपणा बाबत संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील अनेक गावच्या नाल्यावरून पाणी वाहू लागल्या ने काही तास संपर्क तुटला होता.



दरवर्षीप्रमाणे यंदा नगरपंचायत प्रशासनाने पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफसफाई केली नसल्यामुळे शनिवार 31 ऑगस्ट च्या रात्री उशिरा झालेल्या दमदार पावसामुळे नाल्याचे दुर्गंधीयुक्त घाण व पाणी रस्त्यावरून वाहत होते. तर अनेक ठिकाणच्या नाल्या तुडुंब भरून शहरातील प्रभाग क्रमांक 1 शंकर नगर, बजरंग चौक, प्रभाग क्रमांक 13 रहीम कॉलनी, प्रभाग 16 मुर्तुजा नगर, चौपाटी, जनता कॉलनी, वॉर्ड क्रमांक 4 नेहरू नगर यासह अन्य वार्डातील नागरिकांच्या घरात गुडघाभर पाणी शीरले होते. त्यामुळे ग्रह उपयोगी साहित्य भिजून खराब झाले असून, संपूर्ण घराची ओसरी ओली झाल्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. एव्हढेच नाहीतर शहरातील उच्च शिक्षित कामानिजावळील रुख्मिणी नगर भागांतील रस्ते जलमय झाले, उंचीवर घरे असल्याने घरात पाणी शिरले नाही. मात्र दुर्गंधीयुक्त पाण्याने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.



सतत झालेल्या पहिल्याच मोठया पावसानंतर अनेक प्रभागातील नागरिकांनी नांदेड न्यूज लाईव्हशी दूरध्वनीवरून संवाद साधून तसेच व्हिडिओ आणि फोटो पाठवून हिमायतनगर येथील नगरपंचायतीच्या नाकर्तेपणाबाबत संताप व्यक्त केला आहे. जर पावसाळापूर्वी नगरपंचायतीने नाल्याची साफसफाई केली असती तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. तीन महिण्यापासून नाल्यांची सफाई झाली नाही त्यामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असेही अनेकांनी बोलून दाखवले आहे. नगरपंचायत सफाई कर्मचारी व सुपरवायझर केवळ नेत्यांच्या परिसराची हुजेरीगीरी करत असल्याने शहरातील प्रभाग 16, प्रभाग 13, प्रभाग 8, प्रभाग 1 यासह विविध भागात दुर्गंधी पसरली आहे. अनेकदा सांगूनही याकडे प्रशासकीय यंत्रणा दुर्लक्ष करत असल्याने आजच्या पावसाने रस्ते जलमय झाल्याचे दिसून आले आहे.



एकूणच बऱ्याच दिवसांच्या उकाड्यानंतर जिकडे तिकडे देवी देवतांना साकडे घालून वरून राजाला प्रसन्न केले जात होते. दरम्यान रात्री झालेल्या दमदार पावसाने सर्वत्र गारवा निर्माण करून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तरी या पावसामुळे ऐन बहरात आलेल्या पिकांना जीवनदान मिळाले आहे. उद्याचा पोळा सण शेतकऱ्यांना आनंदाने साजरा करण्याचं बळ मिळाले आहे. एकूणच दमदार पावसामुळे दिलासा मिळाला असला तरी आणखी चांगला मोठा पाऊस झाल्याशिवाय वातावरणातील उकाडा कमी होणार नाही नाहीतर भविष्यात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक, शेतकरी बोलून दाखवत आहेत.

एकूणच शहर व तालुका परिसरात शनिवारी रात्री आणि रविवारी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकरी, गोरगरीब नागरिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाने तात्काळ घरपडी आणि शेतीच्या नुकसानीने अडचण आलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देऊन हातभार लावावा. अशी मागणी शहर व परिसरातील नागरिकांतून केली जात आहे. शहराला लागून असलेले पैनगंगा नदी आणि नाले दुथडी भरून वाहू लागले असून एकूणच या झालेल्या ढगफुटी सदस्य अतिवृष्टीच्या पावसामुळे हिमायतनगर शहराला जणू पुराच्या पाण्याने वेडा घातल्या असल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे. यंदा असुरुवाती पासून पाऊस झाला नाही, त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची भीती नागरिक शेतकऱ्यांना होती. मात्र दोन दिवसात झालेल्या या मुसळधार पावसामुळे अक्षरशा सर्वाना हैराण करून सोडले आहे. आता शासनाने नुकसानग्रस्त शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढे येण्याची आवश्यकता आहे.


