नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचा वतीने आयोजित स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता अंतर्गत ,१७ सप्टेंबर ते १ आक्टोबर पंधरवडा दरम्यान आरोग्य तपासणी मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील स्वच्छता महिला व पुरुष कर्मचारी यांच्यी आरोग्य मध्ये शुगर,
कोलेस्टेरॉल,बी.पी, किडनी, लिव्हर तपासणी करण्यात आली. तपासणी मध्ये दोष निघाल्यास पुढील उपचारा साठी गरजे नुसार पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात येणार आहे.
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० मधील साफसफाई महिला व पुरुष कर्मचारी यांची आरोग्य तपासणी करण्यासाठी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शना खाली स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे व अर्जुन बागडी यांनी साफसफाई कार्यरत महिला व पुरुष कर्मचारी यांची तपासणी मातृ सेवा आरोग्य केंद्र सिडकोचे वैद्यकीय अधिकारी एस के.शिंदे,आरोग्य सुपरवायझर सुरेश आरगुलवार,आरोग्य कर्मचारी विष्णुदास गलपवाड, रमेश डोंगरगावकर, पल्लवी मुगटकर, जयश्री दरेगावे,वैशाली वाघमारे यांच्या सह महालबचे नाजमीन बेगम, मनिषा मनेषवार कर्मचारी यांनी सहकार्य केले.