नांदेड/हिमायतनगर, गोविंद गोडसेलवार| आजची तरूण मुल डोक्यावर केस, चेहऱ्यावर दाढी, कंपाळी चंद्रकोर, लावुन छत्रपती शिवाजी महाराजां सारख काहिस दिसन पसंत करत आहेत, परंतु तरूणांनी राजे छत्रपती सारख दिसन नाही तर असन म्हत्वाच आहे, असा सल्ला तरूण मंडळींना हभप राम महाराज पांगरीकर यांनी दिला ते अखंड हरिणाम सप्ताहातील शेवटच्या दिवशी सरसम बु येथे काल्याच्या किर्तन प्रसंगी बोलत होते.


विचारपिठावर गायनाचार्य ज्ञानेश्वर महाराज सिबदरेकर, सिंथवादक दत्ताजी नलावडे, साईनाथ शिंदे, हभप शिवाजीराव वडगावकर, हभप रामराव माने पोटेकर, संदिप पाटिल पवनेकर, मृदंगाचार्य वैभव सावळेश्वरकर, यांची उपस्थिती होते.

काल्याच्या किर्तनात पुढे बोलतांना हभप राम महाराज म्हणाले, काला जीवनाच महत्त्व सांगणारा आहे, भगवान म्हणतात सहा दिवस तुम्ही सप्ताह केला, सहा दिवस तुमची उपस्थिती होती, आज मी तुम्हाला प्रसाद द्यायला येतो, तो काल्याचा प्रसाद सर्वांनी घ्यायचा आहे.


श्री कृष्णलिला प्रसंग सांगत घरात वागण्या पासुन राहण्या पर्यंत प्रंसगातुन साधकांना उपदेश केला , इष्ट कार्य करण्याच सांगत अनिष्ट कामे करू नये अस ते म्हणाले. माणुस प्रसिध्द झाला तर त्यास काला मिळत नाही त्या करीता सिध्द व्हाव लागत. काल्याच महत्व गोपाळ, वारकऱ्यांना आहे.अस म्हणत भगवत भक्तीत स्वत:ला गुंतवुन सिध्द व्हाव.

भक्ती दर्शनातुन करा देखाव्यातुन नको, भक्ती माझ्यामुळ होतेय अस मुळीच समजु नका, आजची तरूण मुल डोक्यावर केस, चेहऱ्यावर दाढी, कंपाळी चंद्रकोर, लावुन छत्रपती शिवाजी महाराजां सारख काहिस दिसन पसंत करत आहेत, परंतु तरूणांनी राजे छत्रपती सारख दिसन नाही तर असन म्हत्वाच आहे, असा सल्ला तरूण मंडळींना दिला.

यावेळी माजी आमदार माधवराव पाटिल जवळगावकर, सरपंच संघटनेचे ता. अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, बंडु पाटिल इस्लापुरकर, ग्रंथपाल गोविंद गोडसेलवार, माजी सरपंच सुनिल वानखेडे, यदुराज मिराशे, सखाराम मंडलवाड, अ़ॅड अतुल वानखेडे, रमेश शिंदे, नारायण कदम, झाकी कलाकार मोतीराम महाराज पार्डीकर, चोपदार विठ्ठलराव वांगे पोटेकर, तबलावादक सदाशिव महाराज पवनेकर, पॅडवादक ओंकार आंदेगावकर, सुनिल दमकोंडवार, साहेबराव गाडे, दिपक कल्याणकर यांची उपस्थिती होती.

जवळगावकर ही बसले महाप्रसादाच्या पंगतीत – सरसम येथिल सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार माधवराव पाटिल जवळगावकर यांनी दहिहंडी कार्यक्रमाला उपस्थिती लावली, दरम्यान ग्रामस्थां सोबत पंगतीत बसुन महाप्रसादाचा लाभ घेतला, भगवत भक्ती सोबतच पंगतीत बसुन भोजन केल्याने त्यांचा साधे पणा दिसुन आला.

