नांदेड। ओबीसी आंदोलक लक्ष्मण हक्के यांना नांदेड शहर व ग्रामीण भागामधून ओबीसी बांधवांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. जि. जालना ता. अंबड वडीगोद्री येथे उपोषणास बसलेले ओबीसी भटक्या विमुक्त जाती, जमातीचे कार्यकर्ते प्रा. लक्ष्मणराव हाके व नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाची दखल घेउन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य करावे व अन्य मागण्यांसाठी नांदेड जिल्ह्यातील ओबीसी बांधवांनी बुधवारी जिल्हाधिकारी अभिजीत राउत यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
लक्ष्मण हक्के यांनी वडीगोद्री येथे ओबीसी आरक्षण बचावासाठी आमरण सुरू केले आहे.या आंदोलनाला मराठवाड्यातुन मोठा पाठिंबा मिळतोय.नांदेड मध्ये देखील ओबीसी बांधव यांनी हक्के यांना पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन केले.सकल ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर एकत्र येत घोषणाबाजी करत हे आंदोलन केले. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देखील देण्यात आले.दरम्यान ओबीसी आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता इतरांना आरक्षण द्यावं, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल.ओबीसी समाज देखील आपली ताकद सरकारला दाखवीन असा इशारा नांदेड येथील सकल ओबीसी समाजाने दिला आहे.
याप्रसंगी ओबीसी नेते अविनाश भोसीकर, अॅड. प्रदिप राठोड, एस. जी. माचनवार, महेंद्र देमगुंडे, प्रकाश राठोड, बबन वाघमारे, अॅड. सोपान देवकत्ते, दिलीप अनगुलवार, मारोती लुटे, गजानन तिप्पनवार, डॉ. विशाल बेलुरे, प्रा. आर.डी. शिंदे, वैभव धनगे, गंगाराम पाटील, सौ. मंगल साखरे, गोविंद फेसाटे, संतोष तेलंग, प्रा. बालाजी पोतुलवार, दत्ता कुंचेलवाड, प्रा. पंडीत सोनाळे, प्रा. एस. एस. नलवाड, प्रा. गौतम दुधडे आदीसह समाज बांधव उपस्थित होते.