धार्मिकतेलंगणानांदेडव्हिडीओ

Shri Ram Katha : पिंपळगाव दत्त संस्थान येथे भव्य ‘श्रीराम कथा’ व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञास उत्साहात प्रारंभ

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर, हदगाव व भोकर तालुक्याच्या मध्यभागी असलेल्या मौजे पिंपळगाव येथील दत्त संस्थानमध्ये दिनांक २० मार्च ते २७ मार्च २०२६ दरम्यान आयोजित भव्य ‘श्रीराम कथा’, १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञ व नामसंकीर्तन सोहळ्याला भव्य शोभायात्रेने जय श्रीराम जय हनुमान.. नामाच्या  जयघोषात सुरुवात झाली आहे.
परमपूज्य गोवत्स बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या धार्मिक सत्संग सोहळ्यात प्रसिद्ध कथावाचक प.पू. गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज (जोधपूर) यांच्या ओजस्वी वाणीमधून श्रीरामकथेचे रसाळ निरूपण केले जात आहे.
शुक्रवारी सकाळी ९ वाजता श्री दत्त संस्थान येथून टाळ-मृदंग, ढोल-ताशे, घोडे व बैलगाड्यांसह साधू-संतांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महिलांनी डोक्यावर कळस घेऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. तसेच शालेय विद्यार्थ्यांनी प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण व संकटमोचन हनुमान यांच्या हुबेहूब झांक्या साकारत वानरसेनेची आकर्षक मिरवणूक सादर केली. या शोभायात्रेत हजारोच्या संख्येने महिला पुरुष भावीक भक्तांनी हाती भगवे ध्वज घेऊन उपस्थिती लावली होती.
दुपारी शोभायात्रा कथा मंडपस्थळी पोहोचल्यानंतर श्रीराम ग्रंथाचे पूजन करण्यात आले व त्यानंतर श्रीराम कथेचा शुभारंभ झाला. आगामी सात दिवस दरम्यान दररोज दुपारी ११ ते २ या वेळेत श्रीराम कथा होणार असून, या सोहळ्यात देशभरातील जगद्गुरू, महामंडलेश्वर, पीठाधीश्वर, संस्थानिक, शिवाचार्य व विविध संत-महंतांची उपस्थिती लाभणार आहे. सप्ताहभर प्रवचन, कीर्तन, नामसंकीर्तन तसेच भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. या भक्तिमय व आध्यात्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकट स्वामी महाराज यांनी केले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button