क्राईमतेलंगणानांदेड

Bidar’s gurudwara : बिदरच्या गुरुद्वाराला बॉम्बने उडवण्याची धमकी

नांदेड| नांदेड जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या बिदर शहरातील धार्मिकस्थान श्री नानकझीरा साहेब गुरुद्वाराला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली आहे. त्यामुळे कर्नाटक, महाराष्ट्र आणी तेलंगानातील शीख समाज अस्वस्थ झाला आहे.

कर्नाटक येथील बिदर शहरात शीख धर्माचे पाहिले गुरु श्री गुरु नानक देवजी यांचा गुरुद्वारा विद्यमान आहे. गुरुद्वारा नानक झीरा साहेब म्हणून गुरुद्वाराची जगभर ओळख आहे. तसेच रोज हजारोंच्या संख्येत भाविक गण येथे दर्शनासाठी भेट देतात. नांदेड मधूनही असंख्य भाविक बीदरला जात असतात. शुक्रवार, दि. १८ जुले रोजी सकाळी बिदर गुरुद्वाराच्या संकेतस्थळावर एका अज्ञात व्यक्तिनी ईमेल पाठवून गुरुद्वाराची इमारत बॉम्बने उडवून देऊ अशी धमकी दिली आहे.

गुरुद्वाराचे अधीक्षक स. जगजीतसिंघ सिलेदार यांनी वरील बाब गुरुद्वारा अध्यक्ष स. बलबीरसिंघ व पोलीस प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिली. पोलीस अधीक्षक श्री प्रदीप गुंटी यांनी ईमेलची चौकशी सुरु करण्याचे आदेश दिले आहे. पोलीस विभाग सध्या चौकशी करीत आहे. सुमारे आठ दिवसापूर्वी अमृतसर येथील गुरुद्वारा हरिमंदर साहब (स्वर्ण मंदिर) येथे ही सारखीच घटना घडली होती. तेथे ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीस पोलिसांनी अटक केली आहे.

त्याचवेळी बीदर गुरुद्वाराला धमकी पाठविणारे तथ्य कोण असावेत याची चौकशी करणे गरजेचे झाले आहे. बिदर गुरुद्वाराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यामुळे नांदेडात देखील अस्वस्थता निर्माण झाली आहे. बिदरच्या गुरुद्वारा ट्रस्ट समितीमध्ये नांदेड, हैदराबाद व इतर शहरातून सदस्य आहेत. घटनेची चौकशी गंभीरतेने व्हावी अशी भावना व्यक्त होत आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button