नांदेड, अनिल मादसवार| मुंबई–नांदेड मार्गावर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) ते हुजूर साहिब नांदेड आणि नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालविण्यात येणार असून ही गाडी चार फेऱ्या पूर्ण करणार आहे. यामुळे सण, लग्नसराई व प्रवासाच्या हंगामात प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.


🚆 मुंबई ते नांदेड विशेष गाडी
गाडी क्रमांक 01041 – लोकमान्य टिळक टर्मिनस ते हुजूर साहिब नांदेड
ही विशेष गाडी दि. 23 व 24 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल.

ही गाडी ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, नगरसोल, छत्रपती संभाजीनगर, जालना, परतूर, सेलू, परभणी व पूर्णा या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 4.00 वाजता हुजूर साहिब नांदेड येथे पोहोचेल.


🚆 नांदेड ते मुंबई विशेष गाडी
गाडी क्रमांक 01042 – हुजूर साहिब नांदेड ते लोकमान्य टिळक टर्मिनस
ही गाडी दि. 24 व 25 जानेवारी 2026 रोजी रात्री 11.30 वाजता नांदेड येथून सुटेल
आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 1.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

🔔 प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
✔️ विशेष गाडीमुळे मुंबई–मराठवाडा प्रवास अधिक सुलभ होणार
✔️ गर्दीचा ताण कमी होऊन आरक्षित तिकीट मिळण्याची शक्यता वाढणार
✔️ भाविक, विद्यार्थी व नोकरी करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा
➡️ प्रवाशांनी या विशेष सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.

