करियरनांदेड

Mla prataprao patil chikhalikar ; आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सोव उत्साहात साजरा

उस्माननगर, माणिक भिसे। शाळा हे शिक्षण व संस्काराचे केंद्र असुन शाळेतुनच शिक्षक देशाचे आदर्श नागरिक व भाग्यविधाते निर्माण होतात.याच लाठीच्या मातीतले आय ए एस . श्रीकेश लाटकर व आयपीएस. संजय लाटकर हे देशाच्या उच्यपदी विराजमान होऊन देशसेवा करत आहेत. त्यांचा आदर्श या मातीतील विद्यार्थीनी घ्यावा असे प्रतिपादन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.

उन्हाळी सुट्टी संपवून दिनांक १६ जून पासून शाळेला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी व राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून लोकप्रतिनिधीनी शाळेत जाऊन पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी आमदार चिखलीकर बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार गोरे, गटविकास अधिकारी महेश पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी मेटकर, तुकाराम वारकड गुरुजी, माजी सभापती आनंदराव शिंदे, माजी सभापती बोडके, एपीआय निलपत्रेवार, सुरेश बास्टे, मु.अ. श्रीमती विद्या वांगे, साईनाथ कपाळे , सरपंच सौ. काळम , ग्रामविकास अधिकारी सौ. शिंदे , डॉ किरण दुलेवाड , वैजनाथ पाटील घोरबांड , बालाजी पाटील घोरबांड , मारोती घोरबांड , चेअरमन रूद्र वारकड , तलाठी पाटील , पोलिस पाटील विश्वाभंर मोरे , आदी उपस्थित होते.

प्रारंभी कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते शाळा प्रवेशोत्सोव सोहळ्याचे उध्दघाटन करण्यात आले. त्यानंतर इयत्ता पहिली वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश नोंदणी करण्यात आली. व पाच टेबलावर विविध प्रकारची आखणी करण्यात आली होती. त्यांनंतर शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगिता वर सादरीकरण करुन मान्यवरांचे स्वागत केले. शाळेच्या वतीने मुख्याध्यापिका सौ वांगे व केंद्रप्रमुख यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका सौ वांगे यांनी प्रास्ताविक मध्ये शाळेविषयी बोलताना म्हणाल्या की , शाळेच्या वेळी परिपाठ घेतान पावसाळ्यात अडचणी येत आहेत. यासाठी शाळेसाठी पेवर ब्लॉक व संरक्षण भिंत, यासह निधीची मागणी पर प्रस्ताविकातून मागणी केली.

पुढे बोलताना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर म्हणाले की , शाळेच्या अडचणी सोडविण्यासाठी मी सदैव तयार शाळेत पेवर ब्लॉग व विकासासाठी दहा लक्ष रूपयांचा त्यांनी जाहीर केला. आमदा चिखलीकर यांनी तेरा मुली दत्तक घेतल्या आहेत त्यांचा शिक्षणाचा सर्व खर्च ते करत असल्याचे सांगितले. धर्माबाद येथील लक्ष्मी नावाची मुलगी पहिल्या वर्गात असतांना दत्तक घेतली आहे ती आता दहाव्या वर्गात शिकत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वारकड गुरुजी, मेटकरी , शालेय समितीचे चे अध्यक्ष मोरे, यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार केंद्र सर यांनी मानले.

शाळेच्या वेळेत पुर्वी अर्धातास अगोदरच आमदार उपस्थित झाले.यावेळी काही कर्मचारी आले नसल्याचे समजले . त्यांचा खरपूस समाचार आमदारांनी घेतला. आमदार येणार असल्याचे माहीत असताना थोडीतरी मनाची….ठेवावी नियमाने नौकरी करायची नसेल तर ईथुन चालते व्हा? असाही दम आमदारांनी भरला..

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button