Mla prataprao patil chikhalikar ; आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सोव उत्साहात साजरा
उस्माननगर, माणिक भिसे। शाळा हे शिक्षण व संस्काराचे केंद्र असुन शाळेतुनच शिक्षक देशाचे आदर्श नागरिक व भाग्यविधाते निर्माण होतात.याच लाठीच्या मातीतले आय ए एस . श्रीकेश लाटकर व आयपीएस. संजय लाटकर हे देशाच्या उच्यपदी विराजमान होऊन देशसेवा करत आहेत. त्यांचा आदर्श या मातीतील विद्यार्थीनी घ्यावा असे प्रतिपादन कंधार लोहा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले.
उन्हाळी सुट्टी संपवून दिनांक १६ जून पासून शाळेला सुरवात झाली आहे. जिल्हाधिकारी व राहुल कर्डिले व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून लोकप्रतिनिधीनी शाळेत जाऊन पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन करण्यात आले होते.यावेळी उस्माननगर येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत प्रसंगी आमदार चिखलीकर बोलत होते. व्यासपीठावर तहसीलदार गोरे, गटविकास अधिकारी...
