नांदेडधार्मिक

Shree Guru Vitthalnath Maharaj ; श्री.गुरू विठ्ठलनाथ‌ महाराज देवस्थान गोपाळ चावडी ‌ये‌थे‌ महाशिवरात्री निमित्ताने भाविकांची गर्दी

नवीन नांदेड l श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज देवस्थान येथे महाशिवरात्री निमित्ताने अखंड दतनाम सप्ताह सोहळा 21ते 27 फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आला होता ,27 फेब्रुवारी रोजी गुरू विठलनाथ समाधीचा महाअभिषेक श्री समाधान महाराज यांच्या हस्ते दुपारी 2 वाजता संपन्न झाला, यावेळी उपस्थित मान्यवरांनी व भक्तांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती,तर‌ महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घेतला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्ताने वर्ष 55 व्या वर्षी तिर्थक्षेत्र गोपाळचावडी ता. जि. नांदेड येथे श्री गुरु विलनाथ महाराज मंदिर देवस्थान गोपाळावडी ता.जि. नांदेड येथे अखंड दत्तनाम सप्ताह पालखी व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाची रुपरेषा दि.21फेब्रुवारी रोजी 27 सोमवार पहाटे 5 वाजता श्री समगिरीजी गुरू जयगिरीजी महाराज, यांच्या हस्ते महापुजा , दत्तनाम सप्ताहास प्रारंभ झाला‌ व सात दिवस अखंड दत्तनाम सप्ताह सुरुवात होईल.

दि. 27 फेब्रुवारी रविवार आमावस्येच्या दिवशी दुपारी 1 वाजता त्रिभुज बबुत्रा व श्री गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या समाधीचा महा अभिषेक, श्री समाधान महाराज यांच्या हस्ते झाली व दुपारी 2 वाजता झाली, यावेळी गंगाप्रसाद धोंडीबा काकडे सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य नादेड ,मनोहर पाटील शिंदे सदस्य, परिषद नांदेड विनय पाटील गिरडे माजी उपमहापौर , साहेबराव बालाजी पा. सेलुकर उपसरपंच गोपाळचावडी , सरपंच सौ.सुरेखा प्रदीप लाखे,दलीत मित्र माधव अंबटवार, श्रीमती गिरजा बाई तुळशिराम डाकोरे माजी सरपंच गोपाळ चावडी, यांच्या सह सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रातील व‌ पत्रकार यांनी दर्शन घेतले.

दुपारी 3वाजता महाप्रसाद रात्री ठीक 7 वाजता गुरु विठ्ठलनाथ महाराज यांच्या पादुका पालखी सोहळा गावातील प्रमुख रस्त्याने निघला यावेळी ‌प्रमुख‌ मार्गावर अनेक ठिकाणी गावकरी यांनी पूजन ‌ करून दर्शन घेतले, रात्री 8 वाजता द. आनंद दत कृपा भजनी मंडळ आलेगाव ,हभप बबलू पाटील वर्तळे व गुरुकृपा भजनी मंडळ सरेगाव ता.मुखेड हभप एकनाथ पाटील गिरे 28 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजता काकडा आरती व अखंड हरिनाम सप्ताह सांगता होणार‌आहे.

संयोजक व मुख्य पुजारी श्री समाधान तुळशीराम महाराज डाकोरे व गावकरी मंडळी गोपाळचावडी यांनी परिश्रम घेतले.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button