लोहा| हल्ली बदलल्या कुटूंब व्यवस्थेत जेथे सासूला जवळ ठेवणाऱ्या सुनांची संख्या बोटावर मोजण्या इतपत असेल.पूर्वी सासू सुनेला जाच करत पण काळ बदलला आणि सुन आता सासूला त्रास करू लागल्याच्या अनेक घटना रोजच घडत असतात. पण त्याला काही कुटुंब अपवाद आहेत. लोहा तालुक्यात हंजराज पाटील बोरगावकर याचे प्रतिष्ठित कुटुंब त्यांच्या मातोश्री श्रीमती प्रेमलाबाई अप्पाराव बोरगावकर (वय ७५ वर्ष) याच्यावर बोरगाव आकनाक या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरची अग्नी त्याचे चिरंजीव हंरासज पाटील व जयेंद्र तसेच स्नुषा पत्नी डॉ विद्या हंसराज पाटील व चिरंजीव मोनाली जयेंद्र पाटील या दोन्ही सुनांनी भडाग्नी दिली. अंथरुणावर पडलेल्या सासूची सहा वर्षे सेवाश्रुषा करणाऱ्या सुनांनी अग्नी देण्याचा पहिलाच प्रसंग. सासू नव्हे आईच हाच सामाजिक संदेश प्रत्यक्ष कृतीतून बोरगावकर कुटुंबियांनी दिला
हल्ली लग्न होऊन घरी लाडक्या सुना आल्यानंतर सासू-सासऱ्यांना आई व बाबा म्हणत आहेत. मामा व आत्यांची जागा या दोन शब्दांनी घेतली खरी पण पुढे कालांतराने आई बाबांच्या “काशा” होतानाच्या अनेक घटना घडताना ऐकू येतात पण आजही अनेक विभक्त – एकत्रित कुटुंबात कौटुंबिक संस्कार व परंपरा जोपासली जाते.
पद्मश्री श्यामराव कदम यांची बोरगाव आकनाक सासुरवाडी कै. आपाराव पाटील हे त्याचे मेव्हूण… श्रीमती प्रेमीलाबाई अप्पाराव पाटील यांचे ७५ व्या वर्षी निधन झाले. त्या गेल्या सहा वर्षा पासून आजारी होत्या. बोरगाव येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी जि प सदस्य हंसराज पाटील व डॉ विद्या पाटील उद्योजक जयेंद्र पाटील व मोनाली पाटील या दाम्पत्यानी भडाग्नी दिली. सासूच्या चितेला सुनांनी अग्नी देणे ही सामाजिक बदलाची व सासू म्हणजेच आई “त्याची सेवा केली पाहिजे असा संदेश देणारी घटना होय यासाठी हंसराज पाटील बोरगावकर यांनी पुढाकार घेतला.उपस्थित नातेवाईक व आप्तस्वकीय याची परवानगी घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला त्यातून कुटुंब वात्सल्य व सासू सासऱ्यांची सेवा केली पाहिजे असा संदेश गेला .
यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, माजी उपमहापौर डॉ. शिला कदम, ऍड मुक्तेश्वर धोंडगे,माणिकराव मुकदम, सचिन पाटील, केशवराव मुकदम, सचिन पाटील चिखलीकर, शरद पवार, श्रीनिवास मोरे, रंगनाथ भुजबळ, विश्वांभर मंगनाळे, संजय भोसीकर, बालाजी पांडागळेसंजय अंबुरे, शैलेश कऱ्हाळे, खुशाल पाटील सुरेश हिलाल , हरिभाऊ चव्हाण, सह मोठ्या संख्येने नातेवाईक , कार्यकर्ते अंत्यसंस्कारासाठी उपस्थित होते.