अमरनाथ यात्री संघाचे अध्यक्ष धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या सिद्धहस्त लेखन शैलीतून रोमांचकारी असणारा अंदमान टूर चा रोज चा वृत्तांत याच ठिकाणी दररोज प्रसिद्ध करण्यात येत आहे. उद्याच्या अंकात सोबत असलेल्या प्रवाशांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार आहेत.तसेच शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार असल्यामुळे वाचकांना ही लेख माला कशी वाटली याबद्दल मोजक्या शब्दात प्रतिक्रिया ९४२१८ ३९३३३ या व्हाट्सअप क्रमांक वर पाठवाव्या ही विनंती. – संपादक
पिएरलेस हे रिसॉर्ट समुद्रकिनाऱ्यावर असल्यामुळे सकाळी सहा वाजता बीचवर फेरफटका मारला. सूर्योदय होत असल्याचे दृश्य पाहून मन प्रफुल्लित झाले. सकाळी मिळालेल्या या सुंदर वातावरणाचा आमचे टुरिस्ट आपल्या परीने फायदा घेत होते.उज्वला व रमेश केंद्रे या योग प्रेमी जोडप्यांच्या मार्गदर्शनाखाली लता व शामसुंदर कदम,यशोदा व उद्धव चौधरी,उमा व विजय कुलकर्णी, प्रा.अंजली व प्रकाश सिंगेवार,कल्पना व प्रा.राम जाधव,ॲड.विजया व तुकाराम इंद्राळे,सुरेखा व रमाकांत भुरे,प्रभा व नागोराव देव,रत्नमाला व रमेश बुलबुले हे योगा करत होते.स्मिता व शिवाजी देशपांडे,सुरेखा व सुभाष भिसे,अनिता व सुधीर देशपांडे,उषा व उत्तम पांचाळ,विद्या व व्यंकट नोमुलवार,सुषमा व रमेश जयकर,सायली व सुधीर देशपांडे, मैथिली व मुकुंद पांडे यांना प्रा. लक्ष्मी पुरणशेट्टीवार ह्या हास्य योगाचे प्रात्यक्षिक करून दाखवित होत्या. आपल्या अनेक छायाचित्रांनी रसिकांची मने जिंकणारे प्रा.प्रकाश लालपोतू यांनी मंजुषा व राजू मोतेवार,वसुंधरा लालपोतू ,शारदा व अनिल कठाळे,शोभा व बालाजी कोटलवार,उषा व नारायणराव गेनवाड,आशा व प्रकाश चेके या जोडप्यांची सुंदर छायाचित्रे काढली.रोहन,स्वाती व ॲड.उमेश मेगदे,मंजू व डॉ.श्रीकांत चौधरी,सविता क्यातमवार,अश्विनी व ॲड.दामिनी डहाळे हे चिमुरडी मनुश्री चौधरीच्या बाललीला पाहण्यात दंग होते.
साडेसातच्या सुमारास अमेरिकन ब्रेकफास्ट घेऊन आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर विमानतळाकडे निघालो. सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर विमानाची वाट पाहत गेट नंबर पाच समोर बसलो होतो. विमान यायला एक तासाचा वेळ होता. सावरकरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचे अजरामर गीत ” जय स्तुते महा मंगले ” सर्वांनी सामूहिक गाण्याचा प्रस्ताव मी ठेवला. सगळ्यांचा होकार मिळाल्यानंतर गाण्याच्या ओळी डाऊनलोड करून ग्रुपमध्ये टाकले. त्यानंतर आम्ही सर्वजण हॉलमध्ये एका बाजूला उभे राहिलो.६१ जनांच्या मुखातून गायलेल्या या गीतामुळे विमानतळा वरचे वातावरणात बदलून गेले.इतर प्रवाशांना देखील हा नवीन प्रकार आवडल्यामुळे त्यांनीही गाताना साथ दिली. कित्येकांनी आपल्या मोबाईल मध्ये हा प्रसंग चित्रित केला. भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो या घोषणांना उपस्थितांनी प्रतिसाद दिला. अचानक घेतलेला हा इव्हेंट टाळ्याच्या कडकडात संपला.
९.४० ला आमच्या विमानाने हैदराबाद कडे झेप घेतली. अडीच तासाच्या प्रवासात बहुतेक सर्वजण डुलक्या घेत होते. हैदराबाद येण्याच्या आधी मनात आला की, विमानात ” जय स्तुते महा मंगले “हे गीत सामूहिकरीत्या म्हणावे. लोक ऑब्जेक्शन घेतील, उगीच वाद नको असा सल्ला सहकाऱ्यांनी दिला. मी मनात विचार केला,सावरकरांच्या प्रेमापोटी आपण करीत असलेल्या या प्रकारामुळे कोणाची नाराजी झाली किंवा कोणी अपमान केला तरी सहन करायचे. म्हणतात ना गाजराची पुंगी वाजली तर वाजली. हिम्मत करून हवाई सुंदरी कडे विचारणा केली. आमचा हा महाराष्ट्राचा ग्रुप सावरकरांचे कट्टर प्रेमी असून आम्हाला त्यांचे गीत म्हणण्याची परवानगी द्यावी.एयर होस्टेस ने हा प्रकार कॅप्टनच्या कानावर टाकला. त्यांनी लगेच सहर्ष परवानगी दिली.
विमानातील फोन सारख्या माईक मधून बोलण्याची आयुष्यात पहिल्यांदाच संधी मिळाली होती.मी अनाउन्स केले की, हम महाराष्ट्र से आये वाले है. आपकी इजाजत हो तो स्वातंत्र्यवीर सावरकर इनका ” जय स्तुते महा मंगले ” यह गीत हम सब मिलकर गानेवाले है. आपभी साथ देना.कोणी काही म्हणण्याच्या आधीच मी आणि सुधीर देशपांडे यांनी ” जय स्तुते ” सुरू केले. आमच्या सोबत असलेल्या ग्रुप मधील इतर सर्वजण मोबाईल हातात घेऊन तयारच असल्यामुळे त्यांची योग्य साथ मिळाली. विमानातील इतर मराठी प्रवासी देखील आमच्या सोबत गीत म्हणू लागले. गीत संपल्यानंतर सर्वांनी घोषणा देऊन टाळ्यांचा कडकडाट केला.याचे शुटिंग एयर होस्टेस सह अनेकांनी केले. दुपारी साडेबाराच्या सुमारास हैदराबाद विमानतळावर उतरल्यानंतर पाच सहा जणांनी माझ्या सोबत सेल्फी काढून आमच्या सावरकर भक्तीचे कौतुक केले.
राजीव गांधी विमानतळावरून दोन एसी लक्झरी बस मध्ये बसून आम्ही निघालो. संदीप मैंद यांनी बिकानेर वाला या हैदराबादच्या प्रसिद्ध हॉटेलमध्ये सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केली होती. रुचकर शाकाहारी भोजनाचा आस्वाद घेतला. तुकाराम इंद्राळे यांच्या आग्रहाखातर हॉटेलमधील एसी हॉलमध्ये निरोप समारंभ घेण्यात आला. प्रा.राम जाधव, श्यामसुंदर शिंदे,प्रा. लक्ष्मी पुदरोड, विजया कुलकर्णी यांनी सगळ्यांच्या वतीने आपल्या भावना व्यक्त केल्या.उषा गेनवाड ह्या शिघ्र कवयित्रीने माझ्यावर व संदीपजी वर तयार केलेली गीते सर्वांना आवडली.तुकाराम इंद्राळे यांनी केलेल्या कवितेला सर्वांनी दाद दिली. वेळेअभावी इतरांना मनोगत व्यक्त करता आले नाही. पण सर्वांचा सूर एकच होता आणि तो म्हणजे आयुष्यातील अविस्मरणीय झाली होती त्यांची अंदमान टूर.जयवंत वाणी या टूर मॅनेजरने चांगली सेवा दिल्याबद्दल सर्वांनी त्याला टीप दिली.
सर्वांच्या आग्रहा वरून संदीप मैंद यांनी आगामी फॅमिली ग्रुप टूर्स ची माहिती पुढीलप्रमाणे दिली.१० नोव्हे २०२४ रोजी ०९ दिवसाची गुजरात स्पेशल, २५ नोव्हे २०२४ रोजी ०९ दिवसाची दक्षिण भारत प्रति व्यक्ती २९५००/- ,कोस्टल कर्नाटक १३ डिसें २०२४ पासून ८ दिवस प्रति व्यक्ती २४५००/- ,गंगासागर जगन्नाथ पुरी ०१ जाने २०२५ पासून ८ दिवस प्रति व्यक्ती २७९००, १७ जानेवारी ला ७ दिवसाच्या अंदमान टूर साठी साठ हजार रूपये खर्च आकारण्यात येणार आहे.२३ जानेवारी २०२५ मध्ये सुरू होणारा राजस्थानचा टुर ९ दिवसाचा आहे.२९५०० शुल्क असलेला उत्तर प्रदेश चा ९ दिवसाचा टुर फेब्रु २०२५ मध्ये निघणार आहे.मार्च २०२५ मध्ये १२ दिवसाच्या नेपाळ साठी टुर कास्ट ३३९०० आहे.१० दिवसाची हिमाचल प्रदेश टूर एप्रिल २०२५ मध्ये पाहण्यासाठी ३०५०० शुल्क आकारले जाते.११ जुलै २०२५ रोजी २६ वी अमरनाथ यात्रा जाणार असून अकरा दिवसा साठी ₹ ३४९०० लागणार आहेत.
अंदमान सहलीचा आजचा शेवटचा दिवस असल्यामुळे सर्वांना परतीचे वेध लागले होते.काचिगुडा स्टेशन वरून ६.४० वाजता अजिंठा एक्स्प्रेस ने आम्ही निघालो. किरण मोरे यांने बाहेरून आणलेले जेवण सर्वांना वाटप केले. रात्री साडेबारा वाजता नांदेड स्टेशन वर सात दिवसांत एकमेकांमध्ये आलेला घनिष्ठपणा आयुष्यभर जपण्याचा निर्धार व्यक्त करून सर्वांनी एक दुस-यांचा निरोप घेतला.उद्याच्या भागात सहप्रवाशांच्या प्रतिक्रिया तसेच शेवटच्या भागात वाचकांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द करण्यात येणार आहे. या लेखमालेला वाचकांनी दिलेल्या भरपूर प्रतिसादाबद्दल ऋण व्यक्त करून तुर्तास सर्वांची रजा घेतो.
चराग़ों को आंखों में महफ़ूज़ रखना, बड़ी दूर तक रात ही रात होगी !
मुसाफ़िर हैं हम भी मुसाफ़िर हो तुम भी, किसी मोड़ पर फिर मुलाक़ात होगी!! (क्रमशः)