नांदेड, दत्ता शिराणे| नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मौजे झरी येथे एका खदानीत बुडून चार तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना दि. ६ मंगळवारी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.


नांदेड शहरातील देगलूर नाका परिसरातील पाच तरुण हे सकाळी लोहा तालुक्यातील झरी येथील एका खदानीवर पोहण्यासाठी गेले होते. यातील चार जन पाण्यात उतरले. आणी एकजण मात्र बाहेर थांबला होता. पोहता येत नसल्याने व तसेच पाण्याचा अंदाज न आल्याने शेख फुज्जाइल, काजी मुज्जमील, आफान, सय्यद सिद्दीकी हे १८ ते २० वयोगटातील तरूण या चार जनांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला असून मोहम्मद फैजान हा एक जन पाण्याबाहेर असल्याने तो वाचला आहे.



घटनेची माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक अविनाशकुमार, पोलीस उप अधिक्षक सुशीलकुमार नायक, सोनखेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने, घटनास्थळी पोहचले. दरम्यान नांदेड येथील गोदावरी जीव रक्षक दलाचे कर्मचारी सय्यद नूर, शेख हबीब, शेख सलीम, सय्यद वखार, कालिदास खिल्लारे, यांनी खदानी मध्ये उतरून मयत चार युवकाचे प्रेत पाण्याबाहेर काढले. हि घटना सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने सोनखेड पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.




