नांदेड। माजी सैनिक सु.ऑनररी कॅप्टन विठ्ठल बालाजी कदम(निवृत्त) यांची जिल्हा सैनिकी कल्याण कार्यालय, नांदेड- परभणी (संयुक्त कार्यालय) कल्याण संघटकपदी नियुक्त करण्यात आली आहे.
नांदेड जिल्हा सैनिक कार्यालय, परभणी-नांदेड संयुक्त कार्यालय कल्याण संघटक या पदावर ९ आगस्ट रोजी नियुक्ती केली असून पदभार स्विकाराला आहे. सदरील नियुक्ती जिल्हा सैनिक अधिकारी परभणी यांनी केली आहे.
या नियुक्ती बदल नांदेड निवासी उपविभागीय अधिकारी महेश वडदकर,व मंडळ अधिकारी हायुम पठाण, *नावामनपाचा* सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, नवीन नांदेड मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष रमेश ठाकूर, सिडको क्षेत्रीय कार्यालय कर्मचारी व माजी सेवानिवृत्त सैनिक यांनी सत्कार करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.