हदगांव, शेख चांदपाशा| हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या शांतता बैठक व पुरस्कार सोहळ्याच्या निमित्ताने हदगाव विधानसभा क्षेत्रातील विविध राजकीय पक्षाचे आमदार… खासदार एका मंचावर दिसणार आहेत.


यामध्ये प्रामुख्याने हिंगोली लोकसभेचे शिवसेना (उबाठा) चे खा. नागेश पाटील आष्टीकर तर शिवसेना( शिदे गट) चे हदगाव विधानसभा क्षेत्राचे आ. बाबुराव कदम कोहळीकर, शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे व काँग्रेसचे माजी आ. माधवराव पाटील जळगावकर अन्य नेते राजकीय विरोधक असले तरी या निमित्ताने बऱ्याच कालावधीनंतर एका मंचावर दिसणार आहेत.


सत्ताधारी व विरोधक हे बडे नेते एकत्र दिसणार असल्याने नागरिकात मात्र उत्सुकता दिसून येत आहे. आणखी विशेष म्हणजे हदगाव शहरात दि 21 ऑगष्ट2025 गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीत प्रथमच नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार अप्पर पोलीस अधिक्षक आर्चना पाटील (भोकर) व पोलीस उपविभागीय अधिकारी संजीवन मिरकीले हे हदगाव पोलीस स्टेशन अंतर्गत घडणाऱ्या गंभीर गुन्हे अन्य गुन्ह्याचे प्रमाण कसे कमी होईल बाबतीत नागरिकांशी थेट संवाद करतील. अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. बराच कालावधीनंतर हदगाव तालुक्यातील विविध खात्याचे प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी नागरिकांना संवाद साधण्याची संधीपण दिसून येत आहे.




