किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट येथील सार्वजनिक दुर्गा देवीची आज दिनांक 12रोज शनिवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाआरती केली आहे. किनवट माऊली विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते माजी आमदार प्रतिज्ञांनी आज दिनांक 12 ऑक्टोंबर सकाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर येथील दुर्गादेवीची महाआरती करून शेतकऱ्याला समृद्ध निरोगी व भरभराटी लाभो यासाठी दुर्गादेवीकडे साकडे घातले.
याप्रसंगी येथील सार्वजनिक दुर्गादेवी मंडळाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मंडळाचे अध्यक्ष संतोष चनमनवार, विश्वास क कोल्हारीकर, शिवराज चाडावार, संजय रावल यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा संचालक बालाजी बामणे, संचालक प्रेमसिंग जाधव, परविन मॅकलवार, गुत्तेदार गुलाब जाधव,माजी नगरसेवक प्रवीण राठोड, देवा तिरमनवार, संतोष दासरवार, नरसिंग ईरपनवार, जयपाल जाधव यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.