लोहा| निवडणुकीत आरोप प्रत्यारोप होताच असतात.हल्ली सोशल मीडिया, रिल्सचा जमाना आहे.वाट्टेल तशा पोस्ट व कमेंट होत असतात पण मतदार संघ निहाय काही आगळ वेगळ असते. काही प्रेरणादायी असते काही इतिहास घडलेला असतो नवीन पिढीला त्याचा अभ्यास असायला पाहिजे. लोहा पूर्वीचा कंधार विधानसभा मतदारसघात जसा “शेकाप “चा खटारा -,काँग्रेसचा पंजा”यांच्यात पारंपरिक लढत व्हायची तशीच १९९० नंतर शिवसेनेचा “धनुष्यबाण “आला .पण ७ निवडणूक व तब्बल ३४ वर्षानंतर यंदाच्या विधानसभा निवडणुकीत “हे चिन्ह “मतदान यंत्रावर राहणार नाही.
लोहा पूर्वी कंधार मतदार संघात भाई केशवराव धोंडगे , ऍड ईश्वरराव भोसीकर, भाई गुरुनाथराव कुरुडे, रोहिदास चव्हाण, प्रतापराव पाटील चिखलीकर शंकरअण्णा धोंडगे व श्यामसुंदर शिंदे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. १९५२ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे गोविंदराव मोरे टेकळीकर हे बैल जोडी या चिन्हावर निवडणून आले होते १९५७ते १९९०या काळात भाई धोंडगे याचा खटारा विधानसभेत गेला.
या मतदार संघात१९९०मध्ये पहिल्यांदा शिवसेनेचा धनुष्यबाण “या निवडणूक चिन्हावर तत्कालीन जिल्हा प्रमुख रोहिदास चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले .तेव्हा भाई धोंडगे याचा “,खटारा ” “विजयी व्हायचा. १९९५ मध्ये पुन्हा “धनुष्य बाण” जोरात चालले. सर्वसामान्य कुटुंबातील रोहिदास चव्हाण यांनी विजय मिळविला.१९९९ मध्ये पुन्हा “धनुष्य बाण” विजयी झाले.२००४,२००९ या दोन निवडणुकीत हरले.२०१४ मध्ये प्रताराव “धनुष्यबाण “यावर लढले व जिकले.२०१९ मध्ये ऍड मुक्तेश्वर धोंडगे यांनी या चिन्हावर निवडणूक लढविली. पण ते हरले.
या वर्षी धनुष्यबाण लोहा विधानसभा मतदारसंघात मतदान यंत्रावर, पोल चट्टीवर राहणार नाही कारण हे चिन्ह शिवसेना शिंदे गटाला मिळाले आहे आणि महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाल सुटली तर महाविकास आघाडीत शिवसेना उबाठा गटाने “मशाल” हे निवडणूक चिन्ह घेतले आहे. काँग्रेस पक्षाच्या सुरुवयातील बैल जोडी त्यानंतर १९६७ मध्ये गाय वासरू तर १९७८ मध्ये हाताला “पंजा”हे चिन्ह मिळाले.कंधार मतदान संघात १९७७, १९८०, १९८५, १९९०,१९९५ व १९९९ व २९१४ या सात विधानसभा निवडणुकीत पंजा निवडणूक निशाणी होती. पण आघाडीत हा मतदारसंघ कधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटलं गेला आणि काँग्रेस पक्षाचा “पंजा”निवडणूक रिंगणात राहिला नाही.
१९९९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली “,घड्याळ”,हे चिन्ह मिळाले .२००४ ,२००९ ,२०१४ २०१९ या सलग चार निवडणुकीत शंकरअण्णा धोंडगे व दिलीप धोंडगे हे घड्याळचिन्हावर लढले तर २०२४ मध्ये प्रतापराव पाटील यांचे निवडणूक चिन्ह आता “घड्याळ”राहणार आहे.२०१४ मध्ये एकदाच भजपाचे “कमळ”हे निवडणूक चिन्ह या मतदारसंघात होते ऍड मुक्तेश्वर धोंडगे त्यावर लढले होते.१९५२ ते २०२४ या १६निवडणुकीत फक्त एकदा २००४ मध्ये मुक्त चिन्ह”शिलाई मशीन “यावर प्रतापरावाच्या रूपाने विजय मिळाला. ,१९९०-नागनाथ गीते (तराजू) शंकर अण्णा धोंडगे (नांगर १९९५),, (१९९-खुर्ची), भाई धोंडगे १९९५,( सायकल)१९९९(कुलूप किल्ली),प्रतापराव पाटील २००९(कपबशी,)हे निवडणूक चिन्ह त्या त्या निवणुकीत गाजले होते.